News Flash

‘एक खराब फळ…’, रविनाचे कंगनाला सडेतोड उत्तर

तिचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुरु असलेल्या तपासादरम्यान अंमली पदार्थ सेवनाची बाब समोर आली. अशातच इंडस्ट्रीमध्ये ९९ टक्के लोकं ड्रग्ज घेतात असा गौप्यस्फोट कंगनाने एका मुलाखतीमध्ये केला होता. त्यानंतर महेश जेठमलानी यांनी ट्विट करत हे सगळं पाहून शांत असणाऱ्या बॉलिवूडला प्रश्न विचारला. तर अभिनेत्री रविना टंडनने यावरुन कंगनाला सुनावले आहे.

कंगनाने एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडमधील ९९ टक्के लोकं ड्रग्ज घेतात असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर महेश जेठमलानी यांनी ट्विट केले. त्यांच्या या ट्विटला अभिनेत्री रविना टंडनने उत्तर दिले आहे.

आणखी वाचा- कंगना रणौतची रणवीर सिंग आणि रणबीर कपूरला विनंती; म्हणाली…’अशी अफवा पसरली आहे की…’

जगभरात ९९ टक्के नेता, बाबू, अधिकारी आणि पोलिस भ्रष्टाचारी आहेत. हे विधान सर्वांसाठी लागू होत नाही. लोकं अतिशय हुशार आहेत. त्यांना चांगलं आणि वाईट यातला फरक कळतो. एक खराब फळ टोपलीतल्या इतर फळांना खराब करु शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्या इंडस्ट्रीमध्ये काही चांगली तर काही वाईट माणसे आहेत या आशयाचे ट्विट करत रविनाने कंगनाला सडेतोड उत्तर दिले आहे.

आणखी वाचा- कंगनाचा करण जोहरवर निशाणा, म्हणाली…

दरम्यान कंगनाने आज पुन्हा ट्विट करत बॉलिवूडमधील कलाकारांवर निशाणा साधला आहे. रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी या दिग्गज अभिनेत्यांनीदेखील त्यांची ब्लड टेस्ट करावी असं मला वाटतं. कारण सध्या रणवीर, रणबीर या अभिनेत्यांना कोकिनचं व्यसन आहे अशी अफवा पसरली आहे. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्ही ड्रग्स टेस्ट करुन घ्या. जर त्यांच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या. तर हेच कलाकार इतरांसाठी प्रेरणास्त्रोत ठरु शकतील, असं ट्विट कंगनाने केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 5:27 pm

Web Title: raveena tandon breaks silence on kangana ranaut claim 99 percent of bollywood uses drugs avb 95
Next Stories
1 ‘गुंजन सक्सेना’ चित्रपटावर बंदी आणण्याच्या मागणीवर दिल्ली उच्च न्यायालय म्हणाले…
2 ‘केजीएफ’ स्टार यशच्या मुलाचा नामकरण सोहळा; व्हिडीओ शेअर करत सांगितलं बाळाचं नाव!
3 ‘सिंगिंग स्टार’मध्ये स्पर्धक पूर्ण करणार कलाकारांच्या गाण्याची फर्माइश; रंगणार विशेष भाग
Just Now!
X