10 July 2020

News Flash

‘हृतिक-कंगनाच्या वादात माझी भूमिका न्यायाधीशाची’

प्रत्येकाला असलेल्या घटनात्मक अधिकारांवर भाष्य या ब्लॉगमध्ये करण्यात आले होते.

कंगनाला पाठिंबा दिल्याचे वृत्त रवीनाने पूर्णपणे फेटाळून लावले.

कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांच्यामध्ये सुरू असलेल्या कायदेशीर लढ्यात अभिनेत्री रवीना टंडन हिने कंगनाला पाठिंबा दिल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्यानंतर रवीनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हृतिक-कंगनाच्या वादात मी कोणा एकाची बाजू घेत नसून, माझी भूमिका न्यायाधीशाची असल्याचे रवीनाने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी रवीनाने एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी ब्लॉग लिहीला होता. प्रत्येकाला असलेल्या घटनात्मक अधिकारांवर भाष्य या ब्लॉगमध्ये करण्यात आले होते. याशिवाय, कंगना-हृतिकमधी वादालाही स्पर्श करण्यात आला होता. मात्र, अनेक वेब पोर्टल्सनी रवीनाने ब्लॉगमधून कंगनाला पाठिंबा दिल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. रवीनाला याबाबतीत विचारण्यात आले. त्यावेळी तिने कंगनाला पाठिंबा दिल्याचे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावले. रविनाने ट्विट केले की, एका मुलीला किंवा मुलाला पाठिंबा देण्याचा हा विषय अजिबात नाही. जे कोणी माझ्या ब्लॉगवर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. त्यांनी ब्लॉगमधील माझे मत नीट समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कोण चूकीचे आणि कोण बरोबर याचा मी न्यायनिवाडा केलेला नाही. मी फक्त एखाद्या व्यक्तीला न्याय मिळविण्यासाठी असलेल्या घटनात्मक अधिकारांवर भाष्य केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2016 4:01 pm

Web Title: raveena tandon not taking sides in hrithik roshan kangana ranaut spat
Next Stories
1 भारत उत्तर कोरियासारखा वाटत असेल तर मतदान होऊन जाऊ द्या- राज्यवर्धन राठोड
2 विशेष : सिनेमाच्या नावावर आक्षेप घेण्याची सेन्सॉरची परंपरा
3 Shilpa Shetty Birthday: शिल्पा शेट्टीने असा साजरा केला वाढदिवस…
Just Now!
X