News Flash

रवीना टंडनचा नातवासोबत खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

(Photo Credit : Raveen instagram)

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. रवीना सोशल मीडिया पोस्टद्वारे समाजिक विषयांवर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. आता रवीनाने नातवासोबत खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून व्हायरल झाला आहे.

तरुणपणीच रवीनाने दोन मुलींना दत्तक घेतले होते. त्यामधील छायाने काही दिवसांपूर्वी एका मुलाला जन्म दिला आहे. तिच्या मुलाचे नाव रुद्र आहे. रवीनाने रुद्रसोबत खेळतानाचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती नातवासोबत खेळताना अतिशय आनंदी दिसत आहे. हा व्हिडीओ जुना असल्याचे देखील रवीनाने पोस्टमध्ये म्हटले आहे.

हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘लॉकडाऊनमधील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवणे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. सध्या रवीनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असून अनेकांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.

रवीनाने १९९५ साली दोन मुलींना दत्तक घेतले होते. एका मुलीचे नाव छाया आहे तर दुसऱ्या पूजा. त्यावेळी पूजा ११ वर्षांची होती तर छाया ८ वर्षांची होती. त्याच काळात रवीनाने अनिल थडानीशी लग्न केले. त्यांना १४ वर्षांची मुलगी राशा आणि ११ वर्षांचा मुलगा रणबीर आहे. रवीना गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. आता ती लवकरच ‘केजीएफ चॅप्टर २’मध्ये काम करताना दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 6:21 pm

Web Title: raveena tandon playing with grandson rudra avb 95
Next Stories
1 महिप कपूर यांनी शेअर केला मिस इंडिया स्पर्धेचा तो व्हिडीओ, मलायका अरोरा म्हणाली…
2 सैफचा मुलगा इब्राहिम अली खान करणार बॉलिवूडमध्ये एण्ट्री, करण जौहर करणार मदत
3 ‘बस करो भाई क्यूँ इतनी इज्जत दे रहे हो’; करीनाचं वागणं पाहून संतापले नेटकरी
Just Now!
X