News Flash

रवीना टंडनने केलं लेकीचं कौतुक; ब्लॅक बेल्ट मिळवल्याचा आनंद

चाहत्यांसोबत सोशल मीडियावरुन संपर्कात

90 च्या दशकात लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री रवीना टंडन आजही प्रेक्षकांना तिच्या बोल्ड अदांनी घायाळ करताना दिसते. रवीना टंडन सोशल मीडियावरही चांगलीच अ‍ॅक्टीव असते. ग्लॅमरस फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.

नुकताच रवीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. . तिने तिची मुलगी राशा थडानी हिच्या सोबतच फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. रवीनाी मुलगी राशाने तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी रवीनाने हे फोटो शेअर केले आहेत. “मेरी बेटी ब्लॅक बेल्ट.. मला तुझ्यावर खुप गर्व आहे.” असं कॅप्शन देत रवीनाने राशाला शुभेच्छा दिल्या आहेत.

या फोटोवरुन रवीनाला मुलीच्या यशाचा आनंद झाल्याचं पाहायला मिळतंय.”संपूर्ण वेळ मास्क घालून आणि पूर्ण खबरदारी घेत तू परीक्षा दिली, या परीक्षेमध्ये सुरक्षा महत्वाची आहे. ती तू बाळगलीस याचा मला खूप आनंद होतोय आणि खास करुन ‘उद्या शाळेत जायचंय ना’ हे तूझं वाक्य” असं कॅप्शन देत रवीनाने मुलीच्या कामगिरीचा गर्व वाटत असल्याची भावना चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

सेलिब्रिटींसह अनेक चाहत्यांनी रवीना आणि तिच्या मुलीचं कौतुक केलंय. अभिनेता समीर सोनी यांन ‘ मस्तचं, सर्व मुलींनी स्वरक्षणासाठी कराटे किंवा  तायक्वांदो अशा प्रकारचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे’ अशी कमेट केली आहे. तर ‘आई तशी मुलगी हुशार’ अशी कमेंट काही चाहत्यांनी दिलीय.

सिनेसृष्टीत असूनही रवीना कायम तिच्या कुटुंबाला वेळ देताना दिसते. अनेकदा रवीना मुलगी राशासोबतचे विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. लवकरच रवीना दक्षिणात्य सिनेमा ‘केजीएफ चॅप्टर २’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2021 11:11 am

Web Title: raveena tandon sahres photo with daughter as she gets black belt in taekwondo kpw89
Next Stories
1 २२ वर्षानंतर अजय-संजय लीला भन्साळी एकत्र, ‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये साकारणार भूमिका
2 गर्लफ्रेंड सोबत राहुलची हेलिकॉप्टर राईड, लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत
3 तक्रारदाराने सादर केलेल्या कागदपत्रांत तफावत
Just Now!
X