अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बॉलिवूडमधील घराणेशाही गॉडफादर नसलेल्या कलाकारांना टिकू देत नाही अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू आहे. या मुद्द्यावर काही सेलिब्रिटींनीही त्यांची मतं मांडली आहेत. अभिनेत्री रविना टंडनने मात्र ट्विट करत इंडस्ट्रीबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. माझंही करिअर उध्वस्त करण्याचे प्रयत्न झाले, असं तिने ट्विटरवर म्हटलंय.

‘तुम्हाला चित्रपटांमधून काढून टाकलं जातं. हिरो त्याच्या गर्लफ्रेंडला चित्रपटात आणतो किंवा काही मित्रांच्या मदतीने चुकीच्या बातम्या पसरवून दुसऱ्यांचं करिअर संपवण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्हाला खूप संघर्ष करावा लागतो. काही लोक ते सहन करू शकतात तर काही नाही’, असे आरोप तिने केले आहेत.

Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
Sanjay Singh
नितीश कुमारांचे बाहेर पडणे ‘इंडिया’ आघाडीसाठी मोठा धक्का? ‘आप’चे संजय सिंह म्हणाले…
raghav chadha british mp meeting
खलिस्तान समर्थकाच्या भेटीमुळे राघव चड्ढा वादाच्या भोवऱ्यात

पुढे तिने लिहिलं, ‘तुम्ही जर याविरोधात आवाज उठवला तर तुम्हाला ढोंगी म्हटलं जातं, वेडं समजलं जातं. हे या इंडस्ट्रीचं सत्य आहे. हे कोणासोबतही होऊ शकतं. माझ्यावर जितका दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला, तितक्याच ताकदीने मी लढा दिला. घाणेरडं राजकारण सर्वत्र होतं. मला या इंडस्ट्रीबद्दल प्रेम आहे, पण इथे तणावसुद्धा खूप आहे. काही लोक चांगले आहेत तर काही राजकारण करणारेसुद्धा आहेत. हे जग असंच आहे.’