सध्या सोशल मीडियावर एका बेकरीमधील व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये टोस्ट उत्पादन कारखान्यातील एक कामगार असे काही घाणेरडे कृत्य करत आहे की ते पाहून तुमचीदेखील पुन्हा टोस्ट खाण्याची इच्छा होणार नाही. हा व्हिडीओ पाहून बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने संताप व्यक्त केला आहे.

रवीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला टोस्ट उत्पादन कारखान्यातील कामगाराचा टोस्टवर घाणेरडे पाय ठेवलेला आणि ते पॅकेटमध्ये भरण्यापूर्वी चाटत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘मला आशा आहे की असे कृत्य करताना ते पकडले जातील आणि त्यांना कठोर शिक्षा मिळेल’ या आशयाचे कॅप्शन देत संताप व्यक्त केला आहे.

A young boy K Ayushmaan Rao dresses up as Ram Lalla
चिमुकला रामलल्ला पाहिला का? रामलल्लांच्या वेषभूषेतील रामभक्ताचा व्हिडीओ होतोय व्हायरल
a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
young Man takes selfie with leopard
Video : “डर के आगे जीत है..” शेतकरी तरुणाने घेतली चक्क चित्ताबरोबर सेल्फी, शेतातील व्हिडीओ होतोय व्हायरल
man riding on bull viral video
बापरे! भररस्त्यावर तरुण झाला रेड्यावर स्वार! व्हायरल Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण…

Raveena Tandon, Raveena Tandon post, Raveena Tandon instagram,

काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हिडीओमध्ये, कारखान्यातील काही कामगार जमिनीवर ठेवलेल्या टोस्टला त्यांचे घाणेरडे पाय लावताना दिसत आहेत. एवढेच नाही तर ते टोस्ट पॅक करताना चाटतानाही दिसतात. व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की कारखान्यातील कामगाराने असे कृत्य मुद्दाम केले आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून, नेटकरी कारखाना आणि तेथे काम करणाऱ्या कामगारांविरोधात संताप व्यक्त करत आहेत.

नेटीझन्सचा संताप व्यक्त

व्हिडीओ GiDDa नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटरून शेअर केला गेला आहे. ज्याला आतापर्यंत ३६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरी या व्हिडीओमधील लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत. काहींनी तर त्यांना अटक करण्याची मागणीही केली आहे.