अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमधील घराणेशाहीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक स्टार किड्सवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. मात्र या टीकेमुळे अभिनेत्री रवीना टंडन संतापली आहे. सुशांतच्या मृत्यूमागे बॉलिवूडचा दोष नाही असं म्हणत तिने टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

अवश्य पाहा – “कमाल आर. खानला अनफॉलो करा”; दिग्दर्शकाची अमिताभ बच्चन यांना विनंती

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने टीकाकारांवर संताप व्यक्त केला आहे. ती म्हणाली, “सुशांतचा मृत्यू ही नक्कीच एक दुदैवी घटना आहे. मात्र या घटनेचे सनसनाटीकरण थांबवा. यामध्ये बॉलिवूडचा दोष नाही. कुठलाही निर्माता एखाद्या अभिनेत्याचं करिअर संपवण्यासाठी कोट्यवधींची गुंतवणूक करुन खराब चित्रपट तयार करणार नाही. कारण यामध्ये त्याचेही नुकसान होणारच आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येसाठी निर्माते किंवा दिग्दर्शकांना दोष देणं थांबवा. यामधून काहीही साध्य होणार नाही.”

अवश्य पाहा – “माझा बॉयफ्रेंड ३० फेब्रुवारीसारखा”; उर्वशी रौतेलाने दिलं लग्नाच्या ‘त्या’ फोटोवर स्पष्टीकरण

रवीनाने यापूर्वी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. “तुम्ही जर याविरोधात आवाज उठवला तर तुम्हाला ढोंगी म्हटलं जातं, वेडं समजलं जातं. हे या इंडस्ट्रीचं सत्य आहे. हे कोणासोबतही होऊ शकतं. माझ्यावर जितका दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला, तितक्याच ताकदीने मी लढा दिला. घाणेरडं राजकारण सर्वत्र होतं. मला या इंडस्ट्रीबद्दल प्रेम आहे, पण इथे तणावसुद्धा खूप आहे. काही लोक चांगले आहेत तर काही राजकारण करणारेसुद्धा आहेत. हे जग असंच आहे.” अशा आशयाचे ट्विट रविनाने केले होते. तिच्या या ट्विटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं होतं.