सध्याच्या काळात तरुणाईमध्ये टिकटॉक या अॅपची तुफान क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. केवळ तरुणाईचं नाही तर अनेक सेलिब्रिटीदेखील या टिकटॉकच्या प्रेमात आहेत. त्यामुळे शिल्पा शेट्टी, रवीना टंडन, रेमो डिसुझा या सारख्या कलाकारांसोबतच काही छोट्या पडद्यावरील कलाकारही टिकटॉक व्हिडीओ करत असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच सध्या लॉकडाउन असल्यामुळे हे सेलिब्रिटी टिकटॉकवर वेगवेगळ्या गाण्यांवरील व्हिडीओ शेअर करत आहेत. यामध्येच अभिनेत्री रवीना टंडनने तिच्या लेकीसोबत एक व्हिडीओ केला असून तो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सेलिब्रिटी कायम विविध माध्यमांचा वापर करत असतात. यात फेसबुक, इन्स्टाग्राम आणि अलिकडेच आलेलं टिकटॉक हे अॅप फायदेशीर ठरत आहेत. या अॅपच्या माध्यमातून कलाकार मंडळी थेट त्यांच्या चाहत्यांशी जोडली जातात. त्यातच लॉकडाउन असल्यामुळे चित्रपट, मालिका यांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत आहेत. यात रवीना टंडनने तिच्या मुलीसोबत एक डान्स व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधत आहे.

टिकटॉकवर अनेक नवनवीन ट्रेण्ड येत असतात, यातील एक ट्रेण्ड रवीना फॉलो करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रवीना तिच्या मुलीसोबत डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या माय-लेकींचा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीत उतरत आहे.

दरम्यान, गेल्या काही काळापासून रवीना मोठ्या पडद्यावर झळकलेली नाही. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. यामध्येच रवीना लवकरच ‘केजीएफ पार्ट 2’ मध्ये झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.