26 October 2020

News Flash

‘साफ सफाईची वेळ…’, ड्रग्ज प्रकरणी दीपिकासह इतर कलाकरांची नावे येताच रविनाने केले ट्विट

तिचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्जच्या अँगलबाबत एनसीबी तपास करत आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर या तपासात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली. तसेच आता D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावं समोर आल्याचे वृत्त ‘आजतक’ने दिले आहे. त्यानंतर अभिनेत्री रविना टंडनने ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

रविनाने केलेले ट्विट सध्या चर्चेत आहे. ‘साफ सफाई करण्याची वेळ आली आहे. स्वागत आहे! आपल्या येणाऱ्या पिढीची मदत करा. इथून सुरुवात करुया मग दुसऱ्या क्षेत्राकडे वळूया. इथून मुळापासून काढून टाकूया. दोषी, यूजर्स, डीलर्स, सप्लायर्स यांना शिक्षा मिळायला हवी. फायदा घेणारे लोकं निशाण्यावर आहेत’ या आशयाचे ट्विट रविनाने केले आहे. दरम्यान रविनाने ट्विटमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही.

आणखी वाचा- ड्रग्ज प्रकरण : तपासादरम्यान अभिनेत्री दीपिका पदुकोणचंही नाव आलं समोर

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावे समोर आली आहेत. एनसीबीला एक व्हॉट्सअॅप चॅट मिळाले आहे. यामध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचे समोर आले आहे. आज तकने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान मोठे गौप्यस्फोट करण्यात आले. श्रद्धा कपूरशिवाय यामध्ये तीन अन्य अभिनेत्रींची ड्रग चॅटही समोर आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 5:26 pm

Web Title: raveena tandon tweet on drugs avb 95
Next Stories
1 “जेव्हा मला अनुरागने घरी बोलावलं..”, माऊली फेम अभिनेत्रीची जुनी पोस्ट व्हायरल
2 ‘सत्यमेव जयते 2’ चं पोस्टर पाहून नेटकऱ्यांनी डागलं टीकास्त्र; म्हणाले…
3 येत्या रविवारी होणार ‘फत्तेशिकस्त’ सिनेमाचा प्रिमियर
Just Now!
X