News Flash

या अभिनेत्रीने मिळवून दिले हरवलेल्या चिमुरडीला तिचे आई-बाबा

ती मुलगी रडत रस्त्याच्या कडेला उभी राहिली होती.

संग्रहित छायाचित्र

संकटात सापडलेल्या एका सात वर्षांच्या मुलीला तिच्या आई वडिलांपर्यंत पोहचवून बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडनने कलाकारांमध्ये असणारी माणसुकी दाखवून दिली आहे. एका कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी म्हणून हजेरी लावल्यानंतर घरी परतत असताना रविनाची नजर या मुलीवर पडली. लहान मुलगी रडत असल्याचे पाहून रविनाने कोणताही विचार न करता तिच्या मदतीला धाव घेतली. मुंबईतील जूहू परिसरात अनेक मुलांमध्ये दु:खी अवस्थेत असणाऱ्या या सात वर्षाच्या मुलीला जखम देखील झाली होती. जखमेची वेदना आणि आपल्या आई वडिलांपासून दूर असल्याने ती मुलगी रडत रस्त्याच्या कडेला उभी राहिली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, दु:खी आणि जखमी असणाऱ्या या चिमुकलीला कोणताही रिक्षावाला तिच्या घरापर्यंत सोडण्यास तयार होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर रविनाने स्वत: पुढाकार घेऊन मुलीला सुखरुप सोडण्याचा निर्णय घेतला. रविना या मुलीला घरी घेऊन गेल्यानंतर आई-वडिलांना पाहाताच मुलीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
रविनाने या वृत्ताला दुजारा दिला असून ‘या परिस्थितीमध्ये त्या मुलीला माझ्या मदतीची गरज होती, तिची सुरक्षितता लक्षात घेऊन मी या मुलीला तिच्या आई वडिलांपर्यंत पोहचविले’, अशी प्रतिक्रिया रविनाने दिली. मुलीला सुखरुप घरी पोहचविल्यानंतर रविनाचे मुलीच्या पालकांनी आभार मानले.
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांच्या वादावर भाष्य करताना रविनाने सलमान खानवर निशाणा साधला होता. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईचे कौतुक करताना आपण प्रथम देशाचे नागरिक आहोत आणि नंतर कलाकार अशी प्रतिक्रिया तिने दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 4:58 pm

Web Title: raveena tondon helps a bruised lost 7 yr old girl
Next Stories
1 चिमुरड्या मिशासह पहिल्यांदाच शाहिद आणि मीरा गेले सुट्टीवर
2 १९७५ च्या आणीबाणीवर येणार सिनेमा
3 लग्न न होण्याच्या बाबतीत प्रियांकाने केला खुलासा
Just Now!
X