नव्वदाव्या दशकात सिनेसृष्टीत पाऊल ठेवतं अभिनेत्री रवीना टंडनने करिअरला सुरुवात केली. त्यानंतर अनेक सुपरहिट सिनेमांमधून रवीनाने तिच्या अभिनयाची छाप पाडत प्रेक्षकांची मनं जिंकली. हटके डान्स स्टाईल आणि दिलखेचक अदाकारीने रवीनाने चाहत्यांना कायम घायाळ केलं.
आजही सोशल मीडियावर रवीना तिचे जबरदस्त फोटो शेअर करत असते. नुकतेच रवीनाने तिचे काही लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वडिलांच्या वाढदिवसानिमित्तानं रवीनाने बालपणीचे फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ”माझं पहिलं प्रेम, माझे हिरो, माझी प्रेरणा आणि आत्मसन्मान” असं कॅप्शन देत रवीनाने हे फोटो शेअर केले आहेत. रवीनाने शेअर केलेल्या बालपणीच्या फोटोतही तिच्या चेहऱ्यावरचं हास्य लक्ष वेधून घेतंय.
View this post on Instagram
रवीना टंडनने नुकतच एका वेब सिरीजचं शूटींग पूर्ण केलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये या शूटींगदरम्यानं रवीनाने खुप धमाल मस्ती केली. हिमाचल प्रदेशमधील भटकंतीचे फोटोदेखील तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 5:29 pm