05 April 2020

News Flash

साडी नेसली तर मला ‘हिंदुत्त्ववादी’ ‘भक्त’ म्हणाल का?-रविना टंडन

ट्विटरवर रविना टंडनने टाकलेल्या फोटोंची ट्विट चांगलीच चर्चा, सोशल मीडियावर रविना हिट!

मी जर साडी नेसली तर मला ‘संघी’, ‘भक्त’ ‘हिंदुत्त्ववादी’ आयकॉन ठरवले जाईल का? असा प्रश्न ट्विट करत अभिनेत्री रविना टंडनने खळबळ उडवून दिली आहे. अभिनेत्री रविना टंडनने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर गुलाबी आणि नीळ्या रंगातल्या साडीतले फोटो पोस्ट केले आहेत. त्याखाली तिने हा प्रश्न ट्विट केला आहे. या फोटोमधला रविना टंडनचा अंदाज अर्थातच घायाळ करणारा आहे. मला साडी नेसायला आवडते.. मग मी कोणत्याही लेबलचा विचार करायला हवाय का? या तिच्या ट्विटवर अनेक नेटिझन्सनी टीका केली आहे. तर अनेकांनी तिचे समर्थनही केले आहे. रविना तू साडीमध्ये सुंदर दिसतेस कोणाच्याही प्रतिक्रियेचा विचार न करता बिनधास्तपणे साडी नेस असा सल्ला तिला अनेकांनी दिला आहे. तर रविना टंडन ही साडीला अकारण राजकीय रंग देते आहे अशी टीका करत तिच्या या प्रश्नाला अनेक नेटिझन्सने झोडपलेही आहे.

Next Stories
1 लंडनमध्ये बंदुकीचा धाक दाखवून ‘मिस साऊथ आफ्रिका’ डेमीच्या अपहरणाचा प्रयत्न
2 पोट भरण्यासाठी नवाजुद्दीन कोथिंबीर विकायचा
3 ‘ट्युबलाइट’नंतर आता शाहरूखचा ‘जब हॅरी मेट सेजल’सुद्धा हॉलिवूडमधून केलाय कॉपी?
Just Now!
X