05 July 2020

News Flash

‘स्टंट मास्टर’ रवी दिवाण मराठी चित्रपटांचे निर्माते

बॉलिवूडमध्ये ‘स्टंट मास्टर’ म्हणून ओळखले जाणारे रवी दिवाण यांनी आता मराठी निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला असून ‘तिचा उंबरठा या मराठी चित्रपटाची निर्मिती ते करणार आहेत.

| March 14, 2014 02:04 am

बॉलिवूडमध्ये ‘स्टंट मास्टर’ म्हणून ओळखले जाणारे रवी दिवाण यांनी आता मराठी निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला असून ‘तिचा उंबरठा या मराठी चित्रपटाची निर्मिती ते करणार आहेत.  मुहूर्त नुकताच रवींद्र नाटय़ मंदिर येथे पार पडला.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी मुहूर्ताची क्लॅप दिली. आरडीएक्स सिनेमा कंपनीची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप घोसनीकर यांचे आहे. चिन्मय मांडलेकर, तेजस्विनी पंडित, ज्योती चांदेकर या कलाकारांवर दृश्य चित्रीत करण्यात आले. सोहळ्यास अभिनेते सुनील शेट्टी, मकरंद देशपांडे, भरत दाभोळकर, कांचन अधिकारी  उपस्थित होते.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2014 2:04 am

Web Title: ravi diwan debut in marathi film ticha umbartha
Next Stories
1 ‘विनोद वीर’ भारती सिंग, किकू शारदा सुनील पाल मराठी चित्रपटात
2 जाणून घ्या, बर्थडे बॉय आमिरच्या या १० गोष्टी
3 सगळीकडे बस्स् सनी सनी सनी!
Just Now!
X