News Flash

बेस्ट किसर म्हणत निया शर्माने केली रवी दुबेची प्रशंसा, पत्नी म्हणाली…

जमाई राजा २.० ही सीरिज २६ फेब्रुवारी रोजी झी ५ प्रिमिअम वर प्रदर्शित झाली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा तिच्या बोल्ड अंदाजामुळे ओळखली जाते. बोल्ड अंदाजासोबतच निया तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकतच नियाने केलेल्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. आता नियाने तिचा सहकलाकार रवी दुबेला बेस्ट किसर म्हटल्याने रवीची पत्नी सरगुनलादेखील मोठा धक्का बसला आहे.

‘जमाई राजा २.०’ या सीरिजमध्ये निया आणि रवी एकत्र काम करताना दिसणार आहेत. या सीरिजमधील एका सीनसाठी त्यांनी अंडरवॉटर किसिंग सीन शूट केला होता. एका मुलाखतीत त्यावर बोलताना नियाने रवी बेस्ट किसर असल्याचे म्हटले होते. तर रवीने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्याची पत्नी, सरगुनची यावर काय प्रतिक्रिया होती हे सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

“मी आश्चर्यचकित झालो. मला आणि सरगुन दोघांनाही नियाचा स्वभाव प्रचंड आवडतो. जेव्हा मी आणि सरगुन दोघांनी नियाचा व्हिडीओ पाहिला तेव्हा आम्ही दोघे ही हसत होतो. कारण आम्हाला तिचा स्वभाव माहित आहे. ती जे बोलली आहे त्याला मी कॉम्पलिमेंट म्हणून घेतलं आहे. निया जे पण बोलते त्याला मी हसत हसत घेतो. आमच्यात काही भांडण किंवा काही नाही” असं रवी म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravi Dubey 1 (@ravidubey2312)

‘जमाई राजा २.०’ ही वेब सीरिज छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका जमाई राजाचे डिजिटल रुपांतरण आहे. पण त्यामध्ये काही बदल करण्यात आले आहे. या सीरिजमध्ये रवी सिद्धार्थ हे पात्र साकारणार आहे तर निया रोशनी हे पात्र साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2021 5:27 pm

Web Title: ravi dubeys wife sargun mehta is shocked as nia sharma said ravi is a best kisser dcp 98
Next Stories
1 ”डराने के लिए नाम ही काफी है”, ‘मुंबई सागा’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज
2 ऐश्वर्या राय बच्चनसारखी दिसणारी ही मुलगी आहे तरी कोण?
3 “बलात्काराच्या धमक्या आणि खालच्या थराच्या ट्रोलिंगमुळे मी घाबरले होते”; अनुरागच्या मुलीचा खुलासा
Just Now!
X