News Flash

रवी जाधवच्या ‘यंटम’चा ट्रेलर ट्रेंडिंग

या चित्रपटातून अभिनेते सयाजी शिंदे सनई वादकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सयाजी शिंदे

निर्माते अमोल ज्ञानेश्वर काळे यांच्या शार्दूल फिल्म्स अॅण्ड एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या रवी जाधव फिल्म्स प्रस्तुत, दिग्दर्शक समीर आशा पाटील दिग्दर्शित ‘यंटम’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. सोशल मीडियावर ट्रेलर पोस्ट केल्यानंतर तो अवघ्या काही वेळातच ट्रेंडही झाला. या चित्रपटातून अभिनेते सयाजी शिंदे सनई वादकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

वाचा : प्रेयसी सान्याशी प्रतिक बब्बर झाला ‘जस्ट एन्गेज्ड’

आजवर अनेक मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपट मी केले. लांबी वाढलेल्या भूमिका देखील असंख्य केल्या. उंची वाढविणारी भूमिका साकारता यावी याच्या प्रतीक्षेत मी होतो आणि ही संधी मला ‘यंटम’ चित्रपटातून मिळाली असल्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले.
या चित्रपटात वैभव कदम आणि अपूर्वा शेळगावकर ही नवी जोडी पहायला मिळणार आहे. तर अभिनेते सयाजी शिंदे सनई वादकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘सनई बोलत नाही, ती थेट काळजाला भिडते’ असे प्रभावी संवाद ही या चित्रपटाची ताकद आहे. ट्रेलरवरून या चित्रपटात एक हळवी मनाला भिडणारी प्रेमकथा पहायला मिळणार असल्याचं दिसतं. सोशल मीडियात या ट्रेलरला प्रचंड प्रतिसादही मिळत आहे.

वाचा : पुन्हा एकदा करणी सेनेचे यू-टर्न; ‘पद्मावत’ सिनेमा पाहण्यास नकार

समीरसह मेहुल अघजा यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. गीतकार मंगेश कांगणे यांचे गीतलेखन असून चिनार-महेश यांचे उत्तम संगीत लाभले आहे. हर्षवर्धन वावरे, योगेश रणमले, आनंदी जोशी, छगन चौगुले यांच्या सुमधुर आवाजात या चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. येत्या २ फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 4:14 pm

Web Title: ravi jadhavs new marathi movie yantam trailer in trend
Next Stories
1 राम गोपाल वर्माने केली दीपिकाची पॉर्न अभिनेत्री मिया मालकोवाशी तुलना
2 Padmaavat Box Office Prediction: ‘पद्मावत’ चार दिवसांत करणार इतक्या कोटींची कमाई!
3 पुन्हा एकदा करणी सेनेचे यू-टर्न; ‘पद्मावत’ सिनेमा पाहण्यास नकार
Just Now!
X