20 February 2019

News Flash

यावेळी PadManchallenge ची ‘पाळी’ विराट कोहलीची

आर बल्की दिग्दर्शित ‘पॅडमॅन’ हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. गेल्या महिन्यात ‘पद्मावत’ सिनेमामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. या चित्रपटाचं सध्या सोशल

‘पॅडमॅन’ चित्रपट ज्यांच्यावर आधारित आहे त्या मुरुगानंदनम् यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘पॅडमॅन चॅलेंज’ #PadManchallenge आणले.

आर बल्की दिग्दर्शित ‘पॅडमॅन’ हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. गेल्या महिन्यात ‘पद्मावत’ सिनेमामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. या चित्रपटाचं सध्या सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन सुरू आहे पण त्याचबरोबर मासिक पाळी, सॅनिटरी नॅपकिप, महिलांचं आरोग्य आणि मासिक पाळीविषयी असलेले पूर्वग्रहही यातून दूर करण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू आहे. ‘पॅडमॅन’ चित्रपट ज्यांच्यावर आधारित आहे त्या मुरुगानंदनम् यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘पॅडमॅन चॅलेंज’ #PadManchallenge आणले.

अरुणाचलम् मुरुगानंदनम् हे कमी किमतीत सॅनिटरी पॅडचे उत्पादन करतता. मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिन विषयी जनजागृती करण्यासाठी मुरुगानंदनम् सोशल मीडियावर ‘पॅडमॅन चॅलेंज’ #PadManchallenge आणले आहे. या चॅलेंजमध्ये सॅनिटरी पॅडसह फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर करायचा आहे. तसेच, फोटो शेअर करताना या चॅलेंजसाठी तुम्हाला योग्य वाटणाऱ्या व्यक्तींना टॅग करायचे आहे. अरुणाचलम् यांनी सॅनिटरी पॅडसह फोटो काढून त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केला आणि ‘पॅडमॅन’ चित्रपटाच्या टीमला हे चॅलेंज देत त्यांना टॅग केले. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अक्षय कुमार, राधिका आपटे, सोनम कपूर आणि निर्माती ट्विंकल खन्ना यांनी हे चॅलेंज स्वीकारून हातात पॅड घेतलेला फोटो शेअर केला. बॉलिवूडमधल्या अनेकांनी हे चॅलेंज स्वीकारल्यानंतर आता हे चॅलेंज स्वीकारण्याची पाळी विराट कोहलीची आहे.

भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या चॅलेंजसाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला नॉमिनेट केलं आहे. मासिक पाळीविषयीचे पूर्वग्रह दूर करण्यासाठी अक्षय कुमार प्रयत्न करत आहे. त्याच्या जिद्दीचे कौतुक करण्यासारखं आहे. अशा शब्दात रवी शास्त्री यांनी अक्षयची स्तुती केली आहे. आतापर्यंत आमिर खान, करण जोहर, हुमा कुरेशी, गीता फोगाट, पीव्ही सिंधू, शबाना आझमी, आलिया भट्ट यांनी हे चॅलेंज स्विकारून पूर्ण केलं आहे. त्यामुळे विराट कोहली हे चॅलेंज पूर्ण करतो का याची उत्सुकता  सगळ्यांना लागली आहे.

First Published on February 7, 2018 2:55 pm

Web Title: ravi shastri indian cricket team coach nominated virat kohali for padmanchallenge