News Flash

RD Burman Birth Anniversary: प्ले लिस्टमध्ये असलीच पाहिजेत अशी पंचमदा यांची ही १० सदाबहार गाणी

जाणून घेऊया...आजुबाजुला रिमझिम पडणारा पाऊस आणि सोबत ऐकलीच पाहिजेत अशी आर. डी. बर्मन यांची ही १० सदाबहार गाणी...

(Source: Express archive photo)

आर. डी. बर्मन अर्थात आपल्या लाडक्या पंचमदा यांचा ८२ वाढदिवस. आज ते आपल्यात नसले तरी त्यांची सदाबहार आणि ऑफबीट गाणी आजही लोकांच्या प्ले लिस्टमध्ये असतात. ६० ते ८० व्या दशतात आर डी बर्मन यांनी दिलेली मेलोडी सॉंग्स आहजी तितकीच टवटवीत आणि मन अगदी प्रफुल्लीत करणारी आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया… आजुबाजुला रिमझीम पडणारा पाऊस आणि सोबत ऐकलीच पाहिजेत अशी आर. डी. बर्मन यांची ही १० सदाबहार गाणी…

१. ‘ऐ मेरी टोपी पलट के आ’
1960 ते 1990 च्या दशकात आर. डी. बर्मन यांनी जवळजवळ ३३१ चित्रपटांना संगीत दिलं. जितके ते संगीतसाठी प्रसिद्ध होते, तितकेच त्यांच्या आवाजासाठी सुद्धा प्रसिद्ध होते. अनेक चित्रपटात त्यांनी स्वतः गाणी गायली आहेत. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांनी सगळ्यात पहिलं गाणं ‘ऐ मेरी टोपी पलट के आ’ कम्पोज केलं. त्यांच्या वडिलांनी हे गाणं ‘फंटूश’ चित्रपटासाठी वापरलं होतं. इतकंच नव्हे तर ‘सर जो तेरा चकराए’ या गाण्याला सुद्धा त्यांनी लहान वयातच संगीत दिलं होतं. हे गाणं सुपरहिट ठरलं. या गाण्यामुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली होती.

 

२. ‘एक लडकी को देखा तो…’ – भारतीय संगीत क्षेत्रावर रोमॅण्टिक गाण्यांवर खरा वर्षाव तेव्हा झाला तेव्हा पंचमदा आणि ‘मेलोडी क्वीन’ आशा भोसले हे दोघे एकत्र आले आणि चित्रपटसृष्टीला मन प्रसन्न करणारे आणि रोमॅण्टिक गाणे देऊ लागले. पंचमदा यांनी पुढे गायिक आशा भोसले यांच्या साथीने अनेक चित्रपट गाजवले. वैयक्तिक आयुष्यात देखील दोघांची जोडी जमली होती आणि १९८० मध्ये दोघांनी लग्न केलं. पण त्यांची संगीतमय लव्ह स्टोरी फार काळ काही टिकली नाही. लग्नाच्या १४ वर्षानंतरच पंचदां यांनी जगाचा निरोप घेतला. पण त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी संगीबद्ध केलेलं ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटाची गाणी प्रचंड गाजली.

 

३. ‘चुनरी संभाल गोरी’ –  पंचमदा फक्त क्लासिकलच पुरतेच मर्यादित राहिले नाहीत. तर त्यांनी भारतीय गाण्यांमध्ये पाश्चिमात्य चालींचा वापर करून अनेक मेलोडी सॉंग्स दिले आहेत. पूर्वांचल आणि बिहारमधील लोकसंगीताचा वापर त्यांनी केलाय. ‘चुनरी संभाल गोरी’ या गाण्यात मन्ना डे आणि लता मंगेशकर यांच्या आवाजामुळं त्याला वेगळी उंची मिळाली आहे. हे गाणं मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलं आहे. ‘आओ ट्विस्ट करे’, ‘भूत बंगला’, ‘जहॉं तेरी ये नजर हैं’, ‘तुमसे मिलके’ या गाणी देखील त्यांची सुपरहिट ठरली.

 

४.
‘चुरा लिया है तुमने जो दिल को…’ – ‘यादों की बारात’ चित्रपटातल्या या गाण्यात पंचमदा यांनी त्यांच्या आवाजाची जादू दाखवली. हे गाणं आजही लोक गुणगुणत असतात.

 

५.
‘बाहों में चले आओ, हमसे सनम का क्या परदा…’ – १९७३ साली रिलीज झालेल्या ‘अनामिका’ चित्रपटातलं हे गाणं आज ही तितकंच प्रसिद्ध आहे जितकं त्यावेळी ते होतं. आर. डी. बर्मन यांनी गायलेलं हे गाणं आजही लोक त्यांच्या प्ले लिस्टमध्ये जतन करतात.

 

६.
‘दम मारो दम…’ – ‘हरे कृष्णा हरे राम’ हा चित्रपट १९७१ मध्ये रिलीज झाला होता. सुप्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान यात दिसून आली. चित्रपटाचं हे गाणं आजही वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये वाजतं. या गाण्याला आर. डी. बर्मन यांनी कम्पोज केलं होतं. ‘दम मारो दम’ या गाण्यात रिमिक्स गाणं जरी आता आलं असलं तरी पंचमदा यांच्या गाण्यापुढे ते रिमिक्स गाणं फिकंच ठरेल.

 

७.
‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं…’- आर डी बर्मन यांच्यासाठी ८० वे दशक खूप भाग्याचं ठरलं. १९७५ साली रिलीज झालेल्या ‘आंधी’ चित्रपटासाठी पंचमदा यांनी ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं’ हे गाणं कम्पोज केलं होतं. हे गाणं थोडं उदास वाटत असलं तरी आज सुद्धा लोकांच्या अगदी मनाला स्पर्श करणारं ठरतं.

 

८.
‘दिलबर मेरे कब तक मुझे…’– अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी ही जोडी असलेलं हे गाणं खूपच सुंदर आहे. ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटातलं हे गाणं आज ही त्या दिवसांची आठवण करून देतं जेव्हा हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि लोक या चित्रपटाचं हे गाणं गुणगुणत ऐकत होते.

 

९.
‘बिती ना बितायी रैना’ – पाऊस आणि पंचमदा यांचं संगीत खूप जवळचा संबंध आहे. पावसाच्या थेंबांचा आवाज मिळवण्यासाठी तर पंचमदा यांनी कमालच केली. पाऊस पडताना अख्खी रात्र घराच्या बाल्कनीत बसून त्यांनी मनाजोगता आवाज मिळवला आणि रेकॉर्ड केला. ‘बिती ना बितायी रैना’ हे गाणं आर.डी. बर्मन यांनी एका हॉटेलच्या रुममध्ये संगीतबद्ध केलं होतं. ‘परिचय’ चित्रपटातील गाण्यासाठी लता मंगेशकर आणि भूपिंदर या दोघांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

 

१०.
‘है अपना दिल तो आवारा’- हेमंत कुमार यांच्या आवाजातील ‘है अपना दिल तो आवारा’ गाण्याला रसिकांची पसंती मिळाली. ‘सोलवा साल’मधील या गाण्यातलं माऊथ ऑर्गन खुद्द पंचमदा यांनी वाजवलं होतं.

पंचमदा हे दिलदार आणि मित्रत्व जपणारे व्यक्ती होते. आज ते या जगात असते तर त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान सुविधांचा पूरेपूर वापर केला असता. अधुनिक तंत्रज्ञान येण्यापूर्वीच पंचम यांचे निधन झाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 11:13 am

Web Title: rd burman birth anniversary 10 evergreen songs by musical maestro pancham da prp 93
Next Stories
1 “मी आता लिपस्किट पण नाही लावली”, म्हणत किरण खेर यांनी कॅमेरासमोर येण्यास दिला नकार
2 आर डी बर्मन यांच्या लग्नाच्या प्रपोजलला आशा भोसले यांनी आधी दिला होता नकार!
3 ‘शोले’ आणि ‘दीवार’ एकाच वेळी करताना…
Just Now!
X