30 May 2020

News Flash

सलमानच्या ‘रेडी’ चित्रपटातील अभिनेत्याचं निधन

वयाच्या २७ वर्षी कर्करोगामुळे या अभिनेत्याचं निधन झालं

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता मोहित बघेल याचे निधन झाले आहे. तो केवळ २७ वर्षांचा होता. कर्करोगामुळे त्याचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शोचे दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी ट्विट करुन मोहितच्या निधनाची बातमी दिली. मोहित लहानपणापासून कर्करोगग्रस्त होता. अखेरच्या काही दिवसांमध्ये तो नोएडा येथील रुग्णालयात उपचार घेत होता. परंतु कर्करोगाचा प्रभाव वाढल्यामुळे त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टर अपयशी ठरले.

मोहितचा जन्म उत्तर प्रदेशमधील एका गरीब कुटुंबात झाला होता. अभिनेता होण्यासाठी तो मुंबईत आला. त्याने ‘छोटे मिया’ या कॉमेडी शोमधून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर त्याला सलमान खानच्या ‘रेडी’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात त्याने ‘छोटे अमर चौधरी’ ही भूमिका साकारली होती. त्याचा अभिनय पाहून सलमान खान देखील प्रचंड खुश झाला होता. परंतु आपल्या फिल्मी करिअरमध्ये आणखी यश मिळवण्याअगोदरच त्याचा प्रवास कायमचा थांबला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 5:24 pm

Web Title: ready actor mohit baghel passes away mppg 94
Next Stories
1 “पूर्व युपीमध्ये कुठेही उतरवा तिथून चालत गावी जाऊ” असं म्हणाऱ्याला सोनू सुदचा रिप्लाय, “नंबर पाठव…”
2 “मनोज वाजपेयींसमोर केला माझा अपमान”; नवाजुद्दीनच्या पत्नीचा आरोप
3 “सलमान खान माझा जीव वाचव”; आजारी अभिनेत्याने केली मदतीची याचना
Just Now!
X