News Flash

रील टू रियल हीरो, महेश बाबूमुळे गरीब मुलाला मिळाले जीवनदान

पाहा फोटो

दक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता महेश बाबूचे चाहते जगभरात आहेत. महेश बाबू फक्त त्याच्या चित्रपटांसाठी नाही तर गरीबांना मदत करण्यासाठी ओळखला जातो. महेश बाबू हृदयाच्या आजारांनी पीडित असलेल्या लहान मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी सुद्धा मदत करतो. काही दिवसांपूर्वीच त्यानं एका गरीब मुलाच्या हार्ट सर्जरीसाठी मदत करून त्याला जीवनदान दिले आहे. त्याची पत्नी नम्रता शिरोडकरने याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

नम्रताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर करत याची माहिती दिली. या फोटोत एक जोडप आणि त्यांच बाळ दिसत आहे. त्यांच्या बाळाच नाव अंकित भार्गव आहे . अंकितच्या सर्जरीसाठी महेश बाबूने मदत केली होती. “आणखी एक चांगली बातमी व्हीएसडी आणि पीडिएची शस्त्रक्रिया केलेल्या अंकित भार्गवला डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता तो पूर्णपणे स्वस्थ आहे. मी या मुलाच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करते. आंध्रा रुग्णालयाच्या हेल्थकेअर टीमचे खूप खूप आभार.” अशा आशयाचे कॅप्शन नम्रताने तो फोटो शेअर करत दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Namrata Shirodkar (@namratashirodkar)

महेश बाबू २०१९ पासून आंध्रा रूग्णालय आणि हीलिंग लिटिल हार्ट्स नावाच्या एका एनजीओसोबत काम करतो. महेश बाबूने आता पर्यंत १००० पेक्षा जास्त मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी मदत केली आहे. महेश बाबूच्या या मदतीचे सगळे चाहते कौतुक करतात.

एवढंच नाही तर महेश बाबू इतर अनेक समाजकार्य करतो. त्याने २०१६मध्ये आंध्र प्रदेशच्या बरीपालम आणि तेलंगानाच्या सिद्धापुरम गावांना दत्तक घेतले. महेश बाबूने त्या गावांना दत्तक घेतल्यानंतर त्या गावांची प्रगती झाली आहे. त्या गावातले लोक महेश बाबूला त्यांचा देव मानतात असे म्हटले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 12:21 pm

Web Title: real life hero mahesh babu sponsored heart surgery of a child dcp 98
Next Stories
1 Video: फोटोग्राफरवर ओरडला तैमूर अन्…, करीना कपूर झाली रागाने लाल
2 आदित्यला मला चित्रपटात न घेण्याचा देण्यात आला होता सल्ला, राणीने केला खुलासा
3 ‘बॉम्बे बेगम्स’समोर नव्या अडचणी; कायदेशीर कारवाईचा इशारा
Just Now!
X