19 September 2020

News Flash

रिअॅलिटी शो स्पर्धक ते आघाडीची बॉलिवूड गायिका; असा आहे भूमी त्रिवेदीचा यशस्वी प्रवास

'राम चाहे लीला चाहे', 'उडी उडी जाए', 'हुस्न पर्चम' यांसारख्या एकाहून एक दमदार गाण्यांनी रसिकांची मनं जिंकणारी गायिका भूमी त्रिवेदी सध्या चांगलीच चर्चेत आहे.

भूमी त्रिवेदी

‘राम चाहे लीला चाहे’, ‘उडी उडी जाए’, ‘हुस्न पर्चम’ यांसारख्या एकाहून एक दमदार गाण्यांनी रसिकांची मनं जिंकणारी गायिका भूमी त्रिवेदी सध्या चांगलीच चर्चेत आहे. ‘इंडियन आयडॉल’सारख्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेऊन भूमीने स्वत:चं गायनकौशल्य सिद्ध केलं. हा शो ती जिंकू शकली नाही पण त्यानंतर कठोर मेहनत करून तिने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. भूमीने गायलेली गाणी तरुणाईच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून पाहायला मिळतात. आता भूमी तिच्या पहिल्या सोलो गाण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘तेरे मेरे दरमियाँ’ हे भूमीचं पहिलं सोलो गाणं असणार आहे. त्यानंतर संजय दत्तच्या आगामी ‘प्रस्थानम’ या चित्रपटातही तिने गाणं गायलं आहे. प्रसिद्ध गायक मिका सिंगसोबत तिने हे पार्टी साँग गायलं असून लवकरच ते गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भूमीने काही गुजराती चित्रपटांसाठीही रेकॉर्डिंग केलं आहे.

वाचा : रिलेशनशिप थीमवर रंगणार महाराष्ट्राची हास्य जत्रा

शाहरुख खानच्या ‘रईस’ या चित्रपटातील ‘उडी उडी’ गाण्याला युट्यूबवर १० कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ‘रामलीला’ चित्रपटातील ‘राम चाहे लीला चाहे’ हे गाणं तुफान गाजलं. आजवर भूमीने अनेकदा सोलो लाइव्ह परफॉर्मन्स तर संगीतकार जोडी सलीम-सुलेमानसाठीही लाइव्ह परफॉर्मन्स केले आहेत. इतकंच नव्हे तर ‘देवदास’ या नाटकातील ठुमरी आणि मुजरासुद्धा तिनेच गायलं आहे. त्यामुळे संगीत क्षेत्रातील हे सर्वांत यशस्वी वर्ष राहिलं असा आनंद ती व्यक्त करते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 2:40 pm

Web Title: reality show contestant to bollywood singer this is the bhoomi trivedi successful journey
Next Stories
1 रिलेशनशिप थीमवर रंगणार महाराष्ट्राची हास्य जत्रा
2 स्थूलपणावरून कमेंट करणाऱ्यांना नेहा धुपियाचं सडेतोड उत्तर
3 लवकरच येतेय ‘फिर से ट्रिपलिंग’
Just Now!
X