News Flash

पैसा झाला मोठा, ४० कोटींमुळे विराट आणि अनुष्काचा ब्रेकअप

विराटने अनुष्काच्या बॉम्बे वेल्वेट चित्रपटासाठी ४० कोटी लावले आहेत.

विराट आणि अनुष्का यांच्या ब्रेकअपच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. या दोघांचा ब्रेकअप का झाला याचे अनेक तर्क-वितर्क आतापर्यंत लावले गेले आहेत. पण त्यांच्या ब्रेकअपचे खरे कारण अद्यापपर्यंत कोणालाचं कळले नव्हते.  पण आता त्यांच्यातील मतभेदामुळे नाही तर ४० कोटीच्या रक्कमेमुळे त्यांचा ब्रेकअप झाला असल्याचा खुलासा झाला आहे.
अनुष्का शर्माच्या एका मित्राने याबाबत खुलासा केला आहे. विराटने अनुष्काच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटासाठी ४० कोटी लावले आहेत. अनुष्का शर्मा, रणबीर कपूर यांचा ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपट अनुराग कश्यपने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाचा एकूण खर्च १२० कोटी रुपये होता. यात ४० कोटी रुपयाची गुंतवणूक विराट कोहलीने केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरात आपटला. केवळ २४ कोटीची कमाई ‘बॉम्बे वेल्वेट’ने केली. जेव्हा विराटने गुंतवलेल्या पैशाचा विषय काढला तेव्हा अनुष्का नाराज झाली आणि त्यानंतर यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगू लागली. आता नक्की काय खरे आहे हे विराट आणि अनुष्काचं सांगू शकतील. सध्या हे दोघेही आपापल्या कामात व्यस्त आहे. अनुष्का सलमानसोबत सुलतानचे चित्रीकरण करतेय. तर दुसरीकडे विराट कोहली देखील वर्ल्डकप मध्ये व्यस्त झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2016 10:53 am

Web Title: reason behind virat kohli anushka sharmas break up
Next Stories
1 जुना ‘पिजरा’ नव्याने!
2 ‘अपेक्षित असलेलंच पडद्यावर दिसेलच याची खात्री नसते’
3 अर्जुन कपूरला विश्रांती हवीय..
Just Now!
X