16 January 2021

News Flash

रेखा-विनोद मेहरा यांनी सर्वांच्या नकळत लग्न केले तेव्हा..

रेखा जेव्हा कोलकाता येथे विनोद मेहरा यांच्याशी लग्न करून सासरी आल्या त्यावेळी त्यांच्या सासूने त्यांना मारण्यासाठी चप्पल हातात घेतली होती.

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये विविध अभिनेते आजवर प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी ठरले आहेत. अशाच काही अभिनेत्यांची चित्रपटसृष्टीतील कारकिर्द मोठी नसली तरीही आपल्या छोट्या कारकिर्दीतही या कलाकारांनी त्यांची छाप सोडली आहे. असाच एक अभिनेता म्हणजे विनोद मेहरा. रुपेरी पडद्यावर गाजलेल्या या अभिनेत्याचे खासगी आयुष्यही तितकेच वादग्रस्त घटनांनी भरलेले होते. वैवाहिक आयुष्य आणि चित्रपट कारकिर्दीला लागलेल्या उतरत्या कळेमुळे त्यांच्या आयुष्यावरही त्या सर्व घटनांचा परिणाम होत होता. ते पुन्हा एकदा चर्चेत आले ते म्हणजे अभिनेत्री रेखा यांच्यासोबतचे त्यांचे नाते सर्वांसमोर उघड झाल्यानंतर.

आपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. रेखा जेव्हा कोलकाता येथे विनोद मेहरा यांच्याशी लग्न करून सासरी आल्या त्यावेळी त्यांच्या सासूने त्यांना मारण्यासाठी चप्पल हातात घेतली होती. इतकेच नाही तर त्यांना घराबाहेरही हाकलून लावले होते. ही एक अशी घटना आहे ज्यास स्वतः रेखादेखील विसरणे अशक्य आहे. रेखा यांच्या आयुष्यातील अशा अनेक गोष्टी यासिर उस्मान यांच्या ‘रेखाः द अनटोल्ड स्टोरी’ पुस्तकात सांगण्यात आल्या आहेत.

कोलकाता येथे लग्न केल्यानंतर रेखा आणि विनोद मेहरा हे मुंबईला आले. त्यानंतर ते थेट त्यांच्या घरी पोहोचले. मेहरा रेसिडेंस येथे पोहोचताच रेखा त्यांच्या सासूचा म्हणजेच कमला मेहरा यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गेल्या. त्या पाया पडण्यासाठी वाकताच कमला यांनी त्यांना हटकले. तसेच, त्यांना घरात प्रवेश देण्यासही नकार दिला. कमला यांना राग अनावर झाल्याने त्यांनी रेखांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा विनोद यांनी आपल्या आईला समजवण्याचा बराच प्रयत्न केला. पण त्यांनी काहीच ऐकले नाही. उलट त्यांनी पायातली चप्पल काढून रेखा यांना जवळपास मारण्याचाच प्रयत्न केला. आपल्या सासूच्या अशा वागण्याने रेखा अचंबित झाल्या होत्या. आजूबाजूची सर्व मंडळी जमली होती. रेखा यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या तेथून नंतर निघून गेल्या. पण विनोद मात्र तिथेच आपल्या आईला समजवत राहिले. रेखासोबत विनोद मेहराचे हे तिसरे लग्न होते. पण, त्यांचे नाते जास्त दिवस टिकले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 1:27 am

Web Title: rekha and vinod mehra marriage story ssv 92
Next Stories
1 एका लक्ष्मीची दुसऱ्या लक्ष्मीसाठी पोस्ट, अक्षय कुमार म्हणाला….
2 जुन्या अंजली भाभीने व्यक्त केली पुन्हा ‘तारक मेहता’मध्ये काम करण्याची इच्छा, पण निर्माते म्हणाले..
3 डिस्लाइकच्या भीतीमुळे अक्षयने ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचे लाईक आणि डिस्लाइक केले हाईड?
Just Now!
X