27 May 2020

News Flash

Video : रेखा यांच्यावर चित्रीत झालेली ‘ही’ १० अविस्मरणीय गाणी

अभिनेत्री रेखा यांचा आज वाढदिवस

बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांचा आज वाढदिवस १० ऑक्टोबर १९५४ ला तामिळनाडूतील चेन्नईमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव भानुरेखा गणेशन. आरसपानी सौदर्यांची देणगी लाभलेल्या रेखा एक उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगनाही आहेत. १९६६ मध्ये ‘रंगुला’ या तेलगू चित्रपटातून त्यांनी बाल कलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले. एकीकडे तेलगू चित्रपटांमध्ये काम करत असताना हिंदीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी त्यांना फार मेहनत घ्यावी लागली. तेलगू सिनेसृष्टी ते हिंदीतील नावाजलेली अभिनेत्री हा रेखा यांचा प्रवास खूप खडतर होता. त्यांनी फार मेहनतीने हिंदी भाषा आत्मसात केली. रेखा यांच्या अदाकारीमुळे त्यांच्या चित्रपटातील गाणी अविस्मरणीय ठरली. ही गाणी आजही चित्रपट रसिकांच्या स्मरणात आहेत. त्यामुळे त्यांच्या अशाच काही गाण्यांची आम्ही तुम्हाला नव्याने आठवण करुन देणार आहोत.

१. गुम है किसी के प्यार में (रामपुर का लक्ष्मण १९७२) : रेखा यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीमधील हे एक गाणं आहे. सत्तरीच्या दशकात रेखा या तेवढ्याच सुंदर दिसायच्या जेवढ्या त्या आता दिसत आहेत. रणधीर कपूर यांच्यासोबत चित्रीत करण्यात आलेले हे गाणे नव्याने प्रेमात पडणाऱ्यांनी एकदा तरी ऐकावेच असे आहे.

२. आज करके श्रृंगार आई (दो अनजाने १९७६) : या थरारपटात रेखा यांच्यासोबत अमिताभ बच्चन, प्रेम चोप्रा आणि मिथून चक्रवर्ती होते. या सिनेमातील त्यांचा डान्स हा उत्कृष्ट स्टेज परफॉर्मन्स कसा असतो, याचे उदाहरण होता.

३. सलाम-ए-इश्क मेरी जान (मुकद्दर का सिकंदर १९७८) : या सिनेमातील ‘सलाम-ए-इश्क’ हे गाणे एवढे प्रसिद्ध झाले की, हे गाणे आजही अनेकांच्या अगदी ओठांवर असते. रेखा आणि अमिताभ यांच्या जोडीला या सिनेमात प्रेक्षकांनी फार पसंत केले होते.

४. परदेसिया ये सच है पिया (मिस्टर नटवरलाल १९७९): या गाण्याची लोकप्रियता काही वेगळी सांगण्याची गरज नाही. या गाण्याच्या लोकप्रियतेमुळेच त्याची नंतरच्या काळात अनेक रिमिक्स व्हर्जन्स आले. परंतु मिस्टर नटवरलालमधल्या गाण्याची जादू काही औरच आहे. या गाण्यात रेखा यांच्यासोबत अमिताभ बच्चन झळकले होते.

५. दिल चीज क्या है (उमराव जान १९८१) : रेखा यांच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांमधील एक सिनेमा म्हणजे ‘उमराव जान’. या सिनेमातील गाणी आणि नृत्य यासाठी ‘उमराव जान’ची आजही आठवण काढली जाते

६. आंखों की मस्ती के (उमराव जान १९८१) : या सिनेमाची निर्मिती जणू रेखासाठीच करण्यात आली होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या गाण्यातही त्यांचे डोळे, मेकअप आणि नृत्य यामुळे दुसरी कोणत्याच गोष्टीकडे नजर जात नाही.

७. रंग बरसे भीगी चुनर वाली (सिलसिला १९८१) : त्यांचे हे गाणे आजही रंगपंचमीच्या सणाचा अविभाज्य भाग आहे. या गाण्याशिवाय आजही अनेकांना रंगपंचमी खेळल्यासारखे वाटत नाही. अमिताभ बच्चन- रेखा यांच्यातील रोमान्स या गाण्यात दाखवण्यात आला आहे.

८. लड़की है या शोला (सिलसिला १९८१) : या सिनेमाला हिट करण्याचे सर्वात मोठे काम अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या जोडीने केले. हे गाणेही या सिनेमासारखेच सुपरहिट ठरले होते.

९. मन क्यों बहका रे बहका (उत्सव १९८५): रेखा यांच्या बोल्ड सिनेमांपैकी हा एक सिनेमा. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेले हे गाणे आजही अजरामर आहे. या गाण्यातून सिनेमाची कथा काय असेल याचा अंदाज येतो.

१०. कैसी पहेली है ये जिंदगानी (परिणीता २००५): हे रेखा यांच्या नवीन सिनेमांपैकी सर्वात लोकप्रिय गीत आहे. या सिनेमातून रेखा अनेक वर्षांनी मोठ्या स्क्रिनवर डान्स करताना दिसल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 8:59 am

Web Title: rekha best dance songs of actress rekha ssj 93
Next Stories
1 Video : बिग बींचा फोटो पाहताच रेखा यांची ‘ती’ प्रतिक्रिया आजही खळखळून हसण्यास पाडते भाग
2 मॉब लिंचिंगविरोधात मोदींना पत्र लिहिणाऱ्या ५० सेलिब्रेटिंवरील देशद्रोहाचा गुन्हा रद्द
3 ‘मैंने प्यार किया’मधील ‘या’ अभिनेत्रीला खावी लागली होती तुरुंगाची हवा
Just Now!
X