बॉलीवूडमध्ये कधी कोणी विचारही केला नसणार अशी घटना नुकतीच घडली. नुकताच स्क्रीन पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार देण्यात आल्यानंतर रेखा यांनी चक्क जया बच्चन यांना मिठी मारली.
स्क्रीन पुरस्कार सोहळ्यावेळी रेखा आणि जया या एकाच रांगेत काही अंतरावर बसल्या होत्या. यावेळी दोघींमध्ये पूर्वीसारखी कटूता दिसली नाही. पण यावेळेस केवळ जया बच्चन यांनाच नाही तर तेथे उपस्थित सर्वांनाच चकित करणारी एक गोष्ट घडली. अमिताभ बच्चन यांना पुरस्कार घोषित होताच रेखा यांनी आनंदात जया यांच्याकडे धाव घेत त्यांना मिठी मारली. विशेष म्हणजे जया यांनीदेखील कोणताही रागरुसवा न दाखवता रेखा यांच्याशी गळाभेट केली.