सौंदर्य आणि कला यांचा अनोखा संगम म्हणजे रेखा! सौंदर्य, अभिनय आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी मजल मारली. आजही त्या तेवढ्याच सुंदर आणि उत्साही दिसतात. बॉलिवूडमध्ये आपल्या सदाबहार अभिनयाने आतापर्यंत अधिराज्य गाजवत आलेल्या रेखा यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केला आहे. नुकताच त्यांनी एका मालिकेच्या प्रोमोसाठी काम केले आहे.

स्टारप्लस वाहिनीने ‘गुम है किसे के प्यार में’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रेखा या मालिकेविषयी बोलताना दिसत आहेत. या प्रोमोमध्ये त्या अतिशय सुंदर दिसत असून त्यांनी कांजीवरम साडी परिधान केली आहे. तसेच त्यांना प्रोमोमध्ये पाहून चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

लवकरच गुम है किसे के प्यार में ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत एका पोलीस ऑफिसरची लव्ह स्टोरी दाखवण्यात येणार आहे. या मालिकेत निल भट्ट, आयेशा सिंग आणि ऐश्वर्या वर्मा हे कालाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका ५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आठ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.