बॉलिवूड अभिनेत्री रेखा या अभिनयाबरोबरच आपल्या व्यक्तिगत आयुष्याबद्दलही नेहमी चर्चेत असतात. त्यांचे आणि बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या तथाकथिक प्रेमप्रकरणाचे किस्से अनेकांच्या आवडीचा विषय बनला होता. असे असले तरी रेखा किंवा अमिताभ यांच्यापैकी कोणीही त्यांच्या नात्याबद्दल साफ बोलले असतील अशा घटना कमीच घडल्या असतील. पण रेखाच्या आयुष्यावर आधारित आलेल्या ‘रेखाः द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. या पुस्तकाचे लेखक आहेत यासिर उस्मान. पुस्तकात केल्या गेलेल्या अनेक खुलाशांपैकी एक म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा यांची सिनेमातली जोडी तुटण्याचे खरे कारण काय?
पुस्तकानुसार अमिताभ यांनी जया बच्चन यांच्यामुळेच कधीही रेखासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता. रेखा यांनी सांगितले की, ‘एकदा मुकद्दर का सिकंदर सिनेमाची ट्रायल सुरु होती. तेव्ही मी प्रोजेक्शन रूममध्ये बसले होते. जया बच्चन पहिल्या रांगेत बसल्या होत्या तर अमिताभ आणि त्यांचे पालक मागच्या रांगेत बसले होते. त्यांना जया यांचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. पण मला मात्र त्या स्पष्ट दिसत होत्या. सिनेमात आमच्या लव्ह सीन दरम्यान त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्याच्या एक आठवड्यानंतर सिनेसृष्टीतल्या प्रत्येकानेच मला सांगितले की त्यांनी (अमिताभ) त्यांच्या निर्मात्यांना सांगितले आहे की ते रेखाबरोबर यापुढे काम करणार नाही. मला सगळे बोलले पण त्यांनी (अमिताभ) एक शब्दही नाही काढला. जेव्हा मी त्यांना याबद्दल विचारलं तर ते म्हणाले की मला याबद्दल काही नको विचारु, मी एक शब्दही बोलणार नाही,’
पुस्तकात उस्मानने सांगितले की जेव्हा ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या लग्नात रेखा सिंदूर लावून गेलेल्या तेव्हा तिकडे हंगामा झाला होता. तिकडे उपस्थित लोकांनी आणि मीडियाने रेखाने गुपचुप लग्न केले असा अंदाज बांधला होता. एवढंच नाही तर जेव्हा रेखा त्या पार्टीत अमिताभ यांच्या बाजूला जाऊन बसल्या आणि त्यांच्याशी बोलू लागल्या तेव्हा तिथे याबद्दल चर्चा तर झालीच शिवाय तिथे उपस्थित असलेल्या जया बच्चन यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेलाही दिसला.
रेखा यांनी पुस्तकात हेही सांगितले की एका सार्वजनिक ठिकाणी त्यांनी एक शेर वाचला होता. रेखाने तो शेर अमिताभ यांना उद्देशून वाचला असा लोकांचा समज झाला पण तो शेर रेखा यांनी जया बच्चन यांना उद्देशुन वाचला होता.