18 October 2019

News Flash

Video : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत ‘रश्के कमर’चा व्हिडिओ व्हायरल

'लक्स गोल्डन रोझ अॅवॉर्ड'मध्ये बॉलिवूडच्या अनेक तारेतारकांनी हजेरी लावली होती.

अभिनेत्री रेखा आणि शाहरुख खान

चिरतरुण सौंदर्यांची व्याख्या नेमकी काय असावी असा प्रश्न उपस्थित झाल्यावर डोळ्यासमोर अभिनेत्री रेखा यांचा चेहरा हमखास डोळ्यापुढे येतो. वयाची ६० ओलांडलेल्या रेखा आजही त्यांच्या सदबहार सौंदर्यामुळे ओळखल्या जातात. या वयातही त्यांचा उत्साह आणि त्यांची एनर्जी वाखाणण्याजोगी आहे. नुकत्याच झालेल्या ‘लक्स गोल्डन रोझ अॅवॉर्ड’मध्ये याचा प्रत्यय आला. रेखा यांनी या पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेता शाहरुख खानसोबत उडत्या चालीचं रश्के कमर या गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.

‘लक्स गोल्डन रोझ अॅवॉर्ड’मध्ये बॉलिवूडच्या अनेक तारेतारकांनी हजेरी लावली होती. यावेळी एव्हरग्रीन अभिनेत्री यांनीदेखील उपस्थिती दर्शविली होती. रेखा यांच्या नृत्याचे आणि अदाकारीचे असंख्य चाहते आहे. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यातही त्यांनी शाहरुखसोबत ठेक धरत चाहत्यांना घायाळ केलं. विशेष म्हणजे त्यांना ‘टाइमलेस ब्युटी’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

रेखा यांना पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर रेखा यांनी थोडक्या शब्दांत आभार मानले आणि त्यानंतर शाहरुखने त्यांना रश्के कमर या गाण्यावर डान्स करण्याची विनंती केली. या विनंतीचा मान राखत रेखा यांनी डान्स केला. रेखाजी तुमच्या प्रत्येक अदाकारीचे असंख्य चाहते आहेत. तुम्ही कोणतंही नृत्य अत्यंत सुंदररित्या सादर करता त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे. या काळातलं रश्के कमर हे गाणं तरुणाईमध्ये चांगलंच लोकप्रिय आहे. या गाण्यावर तुम्ही माझ्यासोबत डान्स करु शकता का? असा प्रश्न शाहरुखने विचारला होता. त्यावर रेखा यांनी होकार देत अप्रतिम नृत्य सादर केलं.

दरम्यान, हिंदी चित्रपटसृष्टीसाठी कार्यरत असणाऱ्या अनेकांसाठीच मानाच्या समजल्या जाणाऱ्या आयफा पुरस्कार सोहळ्यामध्येही रेखा यांनी डान्स केला होता. विशेष तब्बल २० वर्षानंतर त्यांचं नृत्य चाहत्यांना पाहता आलं होतं. त्यानंतर आता रश्के कमरवर थिरकल्यामुळे चाहत्यांसाठी ही पर्वणीच ठरली आहे.

First Published on December 10, 2018 2:34 pm

Web Title: rekha unforgettable dance performance with shahrukh khan