29 September 2020

News Flash

अफेअरच्या चर्चांबाबत परिणीती चोप्रा म्हणतेय ..

सहाय्यक दिग्दर्शक चरित देसाई आणि परिणीती यांच्या नात्याविषयी सध्या अनेक चर्चा आहेत.

परिणीती चोप्रा

हल्ली बायोपिकची क्रेझ आहे. त्यातूनही खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांना सकारात्मक प्रतिसाद मिळतो. सध्या अभिनेत्री परिणीती चोप्रा एका बायोपिकमध्ये काम करतेय. या चित्रपटात ती बॅडमिंटनपटू सायना नेहवालची भूमिका साकारतेय. या चित्रपटासाठी ती खूप मेहनत घेतेय. “या चित्रपटासाठी कितीही वेळ दिला तरीही तो कमीच आहे.” असं परिणीती म्हणाली.

या चित्रपटात आधी श्रद्धा कपूर काम करत होती. या चित्रपटासाठी श्रद्धानेही बॅडमिंटन कोर्टवर जाऊन खूप सराव केला होता. पण नंतर, व्यस्त वेळापत्रकामुळे या चित्रपटात ती काम करू शकली नाही. आता तीच भूमिका परिणीती साकारत आहे.

सहाय्यक दिग्दर्शक चरित देसाईसोबत परिणीती रिलेशनमध्ये आहे अशा अनेक चर्चा आहेत. यासंबंधी बोलताना ती म्हणाली की, “याविषयीच्या कोणत्याच बातमीला मी होकार दिलेला नाही किंवा नकारही दिलेला नाही. या चर्चांची सत्यता माझ्या कुटुंबाला आणि जवळच्या मित्रांना माहित आहे हीच माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. ही माझी वैयक्तिक गोष्ट आहे. त्याविषयी मी काहीही बोलू इच्छित नाही.”

खेळाडूची भूमिका करण्याची परिणीची खूप आधीपासून इच्छा होती. या चित्रपटाच्या निमित्ताने तिची इच्छा पूर्ण होणार आहे. सप्टेंबरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 12:08 pm

Web Title: relationship parineeti chopra badminton djj 97
Next Stories
1 Photo : जॉन सीनाने शेअर केलेल्या मीम्सवर शिल्पा शेट्टीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
2 बॉलिवूडच्या या अभिनेत्रीमुळे मी पाहिले कलाविश्वात येण्याचे स्वप्न – कियारा अडवाणी
3 Super 30 : चित्रपटातील हा प्रसंग पाहून आनंद कुमारांच्या आईला अश्रू अनावर
Just Now!
X