रिलायन्स होम व्हिडिओ आणि गेम्सने नुकतंच ‘रागिनी एमएमएस२’ च्या होम व्हिडिओचे अनावरण केले. २०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘रागिनी एमएमएस’चा सिक्वल असलेल्या या थरारक चित्रपटात सनी लिओनी मुख्य भूमिकेत दिसली होती.
बालाजीसोबत या चित्रपटाच्या होम व्हिडिओचे अनावरण करताना आम्हाल फार आनंद होत आहे. हा चित्रपट लोक घरीदेखील पाहू शकतील, असे रिलायन्स होम व्हिडिओ आणि गेम्सच्या सीओओ श्वता अग्निहोत्री म्हणाल्या. ब्लू रे – रू.७९९, डीव्हीडी- रू.२९९ आणि व्हिसीडी- रु.१२५ या तीन फॉरमॅटमध्ये ‘रागिनी एमएमएस २’च्या होम व्हिडिओ सीडी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 8, 2014 10:49 am