News Flash

घरगुती हिंसाचाराच्या आरोपातून अभिनेत्री रिंकी खन्नाला वगळले

दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांची जवळची मैत्रीण असलेल्या अनिता अडवाणी यांनी घरगुती हिंसाचारप्रकरणी केलेल्या आरोपातून खन्ना यांची धाकटी मुलगी रिंकी खन्ना हिचे नाव उच्च न्यायालयाने

| March 21, 2015 12:53 pm

दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांची जवळची मैत्रीण असलेल्या अनिता अडवाणी यांनी घरगुती हिंसाचारप्रकरणी केलेल्या आरोपातून खन्ना यांची धाकटी मुलगी रिंकी खन्ना हिचे नाव उच्च न्यायालयाने गुरुवारी वगळले. त्याचवेळेस अभिनेत्री डिंपल कपाडिया, अभिनेता अक्षय कुमार आणि टि्वंकल खन्ना यांना मात्र न्यायालयाने या प्रकरणी दिलासा दिलेला नाही.
अडवाणी यांनी डिंपल, अक्षय कुमार, टि्वंकल आणि रिंकी अशा चौघांविरुद्ध घरगुती हिंसाचारप्रकरणी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली होती. खन्ना यांच्या निधनानंतर त्यांच्या अन्य कुटुंबीयांनी आपल्याला घरातून हाकलून लावले. तसेच त्यांच्या अत्यंसंस्काराच्या वेळेसही धक्काबुक्की केल्याचा आरोप अडवाणी यांनी केला आहे. शिवाय राजेश खन्ना यांच्या मालमत्तेवरील काही भागावर हक्क सांगत दर महिन्याला देखभाल खर्च आणि वांद्रे येथे तीन खोल्यांचे घर देण्याची मागणी केली आहे. अडवाणी यांच्या तक्रारीची दखल घेत महानगरदंडाधिकाऱ्यांनी डिंपल, अक्षयकुमार, टि्वंकल आणि रिंकी यांना नोटीस बजावत उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. त्याविरोधात या चौघांनी उच्च न्यायालयात धाव घेत अडवाणी यांनी घरगुती हिंसाचाराप्रकरणी केलेली तक्रार रद्द करण्याची मागणी केली आहे.
न्यायमूर्ती एम. एल. टहलियानी यांच्यासमोर या प्रकरणी सध्या सुनावणी सुरू आहे. गुरुवारच्या सुनावणीच्या वेळेस खन्ना यांचे कुटुंबीय खन्ना यांच्यासोबत राहत नव्हते. त्यामुळे अडवाणी घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत त्यांच्याविरुद्ध तक्रार करू शकत नाही आणि मालमत्तेत हक्क मागता येऊ शकत नाही, असा दावा खन्ना कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आला. युक्तिवादाच्या वेळेस रिंकी हिचा विवाह झालेला असून ती कोलकाता येथे राहते आणि तिचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे पुढे आल्यानंतर न्यायालयाने तिचे तक्रारीतून नाव वगळले.
अडवाणी यांनी हिरवा कंदील दाखविल्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला. या प्रकरणी अक्षय कुमार याचे नावही वगळण्याची सूचना न्यायालयाने अडवाणी यांना केली. मात्र अक्षय आणि टि्वंकलनेच आपल्याला घरातून खन्ना यांच्या ‘आशीर्वाद’ या बंगल्यातून हाकलल्याचा दावा करत अडवाणी यांनी अक्षयचे नाव वगळण्यास विरोध केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2015 12:53 pm

Web Title: relief for rinke khanna in the domestic violence case
Next Stories
1 शाहरूखवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
2 ‘टाईमपास २’ची हॉलीवूड स्टाईल प्रसिद्धी
3 ‘आपण ठरवू तो दिवस शुभारंभ’
Just Now!
X