20 January 2021

News Flash

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळात सेलिब्रिटीचं रक्तदान

गणेशोत्सवाच्या काळात आरोग्य शिबीर घेण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या संकल्पाला सुरुवात झाली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात आरोग्य शिबीर घेण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या संकल्पाला सुरुवात झाली आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे जनआरोग्य वर्ष शनिवारी रक्तदान शिबिराने सुरू करण्यात आले. तर ३ ऑगस्टला लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरोग्योत्सवाची सुरुवात होणार आहे. या आरोग्योत्सवाला प्रसिद्ध कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूझाने हजेरी लावली आणि त्याने रक्तदान केलं.

करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मुंबईतील काही मंडळांनी यंदा गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना न करता सामाजिक काम, आरोग्य शिबिरे घेण्याचा संकल्प केला. ३ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आरोग्योत्सव होणार असून त्याची रूपरेषा शनिवारी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून जाहीर करण्यात आली. केईएम रुग्णालयाच्या सहकार्याने हे शिबीर होत असून ३ ते ३१ ऑगस्ट दरम्यान सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळात रक्तद्रव दानाकरिता नोंदणी करता येणार आहे.

याच कालावधीत गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या संघर्षांत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये व शौर्यचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच करोनाविरोधी लढाईत जनतेची सेवा करताना प्राण गमावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना १ लाख रुपये व शौर्यचिन्हाने सन्मानित केले जाईल. तर २२ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या काळात विविध आस्थापनांतील कोविडयोद्धय़ांचा सन्मान केला जाणार असून सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत रक्तदान शिबीर घेतले जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 3:23 pm

Web Title: remo dsouza donated blood at lalbaug cha raja blood donation and plasma donation drive ssv 92
Next Stories
1 अक्षयने करीनाच्या अंगावर फेकला कॉफी मग?, व्हिडीओ व्हायरल
2 दिशा पटानीचं वर्क फ्रॉम होम; घरी राहून करते ‘हे’ काम
3 अमाल मलिकने छेडले सलमान फॅन्सविरुद्ध ट्विटरवॉर?
Just Now!
X