ऑस्ट्रेलियातील सुपर कार रेसर रेनी ग्रेसीच्या एका निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. तिने मोटरस्पोर्ट्स खेळण बंद केले असून आता ती अडल्ट इंडस्ट्रीकडे वळली आहे. ग्रेसी ही ऑस्ट्रेलियातील V8 सुपरकार्स रेसर मधील पहिली फूल टाईम रेसर होती.

रेनी ग्रेसीने नुकताच एका मुलाखतीमध्ये हा निर्णय घेण्यामागचे कारण सांगितले आहे. तिने याबाबत सांगताना तिचा हा सर्वात चांगला निर्णय असल्याचे म्हटले आहे. ‘मी माझ्या आयुष्यात घेतलेला हा सर्वात चांगला निर्णय आहे. या निर्णयामुळे माझी आर्थिक परिस्थिती सुधारली. मी याचा कधी विचारही केला नव्हता’ असे ती म्हणाली.

 

View this post on Instagram

 

Hey

A post shared by RENÈE GRACIE (@renee_gracie) on

‘मला लोकं काय म्हणतात याचा मी विचारत करत नाही. पण मला चांगले पैसे मिळत आहेत आणि मी जे काही करत आहे त्यामध्ये आनंदी’ असे तिने टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

ग्रेसी २००८मध्ये फुल टाइम सुपरकार्स रेसर होती. २०१५ पर्यंत तिने चांगले प्रदर्शन केले होते. पण २०१७मध्ये ग्रेसीचे रिजल्ट कमी झाल्यावर तिला स्पॉन्सर्स मिळणे बंद झाले. त्यामुळे कंपनीने तिच्या जागी दुसऱ्या रेसरची निवड केली. त्यानंतर तिने थोडे फार पैसे मिळवण्यासाठी एका गॅरेजमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पण काही दिवसांमध्ये ग्रेसीला जाणवले की, यातून तिची आर्थिक परिस्थिती फारशी सुधारणार नाही. त्यामुळे तिने पैसे कमवण्यासाठी दुसरा मार्ग शोधण्याचा निर्णय घेतला.

 

View this post on Instagram

 

Being cute bae

A post shared by RENÈE GRACIE (@renee_gracie) on

ग्रेसी दिसायला अतिशय सुंदर असल्यामुळे तिने एका साइटची मदत घेतली. तिने या वेब साइटवर तिचे अकाऊंट उघडले आणि स्वत:चे न्यूड फोटो, व्हिडीओ विकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तिने एका आठवड्यामध्ये ३ हजार डॉलर (जवळपास २.२६ लाख रुपये) कमवले. नंतर हळूहळू तिच्या सब्सक्रायबरची संख्या वाढत गेली. २५ वर्षीय ग्रेसीने एका मुलाखतीमध्ये आता तिचे सात हजार पेक्षा जास्त सब्सक्रायबर असल्याचे म्हटले आहे.