26 February 2021

News Flash

एप्रिल महिन्यात होणार सोनम- आनंदचे शुभमंगल?

आनंद आणि सोनम येत्या काळात त्यांच्या नात्याला नवे नाव देऊ शकतात

सोनम कपूर, आनंद अहुजा

‘फॅशनिस्टा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा बहुचर्चित प्रियकर आनंद अहुजा सध्या सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहेत. अनेक कार्यक्रमांनाही हे दोघं एकत्र पाहायला मिळतात. त्यामुळे आता त्यांचे नाते कोणापासूनही लपून राहिेलेलं नाही. सोनमने आनंदसोबतच्या नात्याचा उघडपणे स्वीकार केला नसला तरीही सोशल मीडियावरील पोस्ट पाहता आता ही बाब अनेकांपर्यंत पोहोचली आहे. किंबहुना आनंद आणि सोनम येत्या काळात त्यांच्या नात्याला नवे नाव देऊ शकतात असेही म्हटले जातेय.

एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या माहितीनुसार, येत्या एप्रिल महिन्यात बी- टाऊनची ही फॅशनिस्टा आनंदसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची चिन्हं आहेत. छोटेखानी कौटुंबिक सोहळ्यात ती लग्न करणार असल्याचे म्हटले जात असून, जवळच्याच मित्रपरिवाराचीच या सोहळ्याला उपस्थिती राहिल असे कळते. भारतातच हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचे वृत्त आहे. जोधपूर येथे त्यांचा लग्नसोहळा होणार असून संबंधित विवाहस्थळाची बुकिंगही झाली असल्याचे कळते.

पाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल

२०१७ या वर्षात काही सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकले. यामध्ये झहीर खान- सागरिका घाटगे, अनुष्का शर्मा- विराट कोहली या नावांचा समावेश आहे. याच यादीत येत्या काळात सोनम आणि आनंदच्या नावाची वर्णी लागली तरीही त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मागील तीन वर्षांपासून सोनम आणि आनंद एकमेकांना डेट करत आहेत. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये या दोघांनीही इतरांना त्यांच्या नात्याविषयी फार काही कळू दिले नव्हते. पण, आता मात्र तसे नसून सोनम आणि आनंद त्यांच्या नात्याविषयी फार काही लवपवताना दिसत नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 4:14 pm

Web Title: report says bollywood actress sonam kapoor and beau anand ahuja will marry this april in jodhpur
Next Stories
1 नव्या चित्रपटासाठी ऐश्वर्याने घेतले घसघशीत मानधन
2 Padmavati Controversy : प्रसून जोशींना सेन्सॉरच्या अध्यक्षपदावरुन हटवा, करणी सेनेची मागणी
3 Happy Birthday Deepika Padukone : ‘ओम शांती ओम’ नव्हे, तर ‘या’ चित्रपटातून दीपिकानं केली होती करिअरची सुरूवात
Just Now!
X