News Flash

सुबोध भावेपासून बिग बींपर्यंत; सेलिब्रिटींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

पाहा, सेलिब्रिटींनी शेअर केलेल्या पोस्ट

संपूर्ण देशभरात आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचं आणि मांगल्याचं वातावरण पसरलं आहे. प्रत्येक भारतीय एकमेकांना शुभेच्छा देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करत आहे. यामध्येच कलाविश्वातील सेलिब्रिटींनीदेखील चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

आज प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधत मराठी कलाविश्वापासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर व्हिडीओ, फोटो पोस्ट करुन या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre)

बिग बींनी ट्विट करत, ‘आनंदी, समृद्धी आणि सुरक्षित’ राहण्याचा सल्ला देत शुभेच्छा दिल्या आहेत. तर, अभिनेत्री सोनाली बेंद्रेने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
‘प्रत्येक व्यक्तीचं जीवनमान बदलण्याचा प्रयत्न करु’, असं म्हणत सोनू सूदने चाहत्यांना वचन दिलं आहे. तसंच ‘प्रजासत्ताक दिनानिमित्त आपलं संविधान जाणून घ्या आणि स्वातंत्र्य कसं मिळालं ते नक्की पाहा’, असं कंगना रणौतने म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prarthana (@prarthana.behere)

बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुबोध भावे, प्रार्थना बेहरे या कालाकारांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 1:48 pm

Web Title: republic day in marathi and bollywood celebrity celebrated ssj 93
टॅग : Republic Day
Next Stories
1 ‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम अखेर झाला लॉंच, अक्षयने शेअर केला व्हिडीओ
2 ईदच्या दिवशी धडकणार ‘सत्यमेव जयते 2’चं वादळ; पोस्ट शेअर करत जॉन म्हणतो…
3 कोणी घर देता का घर..? राजकुमार राव नवीन घराच्या शोधात; नेटकरी म्हणतात…
Just Now!
X