06 July 2020

News Flash

रेश्मा सोनावणे म्हणतेय ‘आता होऊ द्या खर्च’!

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे राजकारण तापलेले असतानाच या पाश्र्वभूमीवर ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

| October 5, 2014 01:02 am

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे राजकारण तापलेले असतानाच या पाश्र्वभूमीवर ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा विषय निवडणूक आणि राजकारण असाच आहे. गायिका रेश्मा सोनावणे यांच्या आवाजातील ‘आता होऊ द्या खर्च’ ही लावणी चित्रपटात आहे. ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या मराठी चित्रपटाचा हा सीक्वेल आहे.  
सद्य राजकीय परिस्थितीवर ही लावणी असून त्याचे गीतकार अरविंद जगताप असून संगीत शशांक पोवार यांचे आहे. मराठीत पहिल्यांदाच निऑन कलर्सचा वापर करून हे या गाण्याचे सादरीकरण क+रण्यात आले आहे. गायिका ऊर्मिला धनगर यांच्या आवाजातील ‘नटरंगी नार’ हे आणखी एक गाणे चित्रपटात आहे.
अभिनेते मकरंद अनासपुरे व सयाजी शिंदे यांच्या अभिनयाची जुगलबंदी यात पाहायला मिळणार आहे.चित्रपटात हिंदीतील ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ, आशीष विद्यार्थी तसेच डॉ. विलास उजवणे आणि अन्य कलाकार आहेत.
चित्रपटातील गाण्यांच्या ध्वनिफितीचे प्रकाशन नुकतेच मुंबईत एका कार्यक्रमात मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, आशीष विद्यार्थी यांच्या हस्ते झाले. या वेळी चित्रपटाशी संबंधित कलाकार, तंत्रज्ञ आणि अन्य सर्व मंडळी उपस्थित होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2014 1:02 am

Web Title: reshma sonawane says ata hou dya kharcha
टॅग Entertainment
Next Stories
1 डहाणूकर कॉलेजची ‘लौट आओ गौरी’ अव्वल
2 व्हीजे अँडी आणि कामिया पंजाबीकडून ‘बिग बॉस’ स्पधर्काना धडे
3 चंद्रपूरची आई व मुलगी ‘कौन बनेगा करोडपती’त
Just Now!
X