06 August 2020

News Flash

.. म्हणून विद्याने मराठी चित्रपटात काम केले

तुला मराठीत पदार्पण करण्यासाठी हा चित्रपट उत्तम आहे.

‘शोला जो भडके दिल मेरा धडके… दर्द जवानी का सताये बढबढ के’ म्हणत सगळ्यांनाच साध्या सरळ नृत्याकडे आकर्षित करणाऱ्या भगवान दादांच्या जीवनावर चित्रपट येऊ घातला आहे.  भगवान दादा यांचा जीवनपट ‘एक अलबेला’ गेले कित्येक दिवस विविध कारणांनी चर्चेत आहे. भगवान दादांची भूमिका मंगेश देसाई साकारत आहे. त्याने आत्मसात केलेला भगवान दादांचा लूक, अभिनय आणि त्याची नृत्यशैली याची चर्चा सिनेसृष्टीत सुरू आहे. या चित्रपटाचा अजून एक चर्चेचा विषय म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन.. ‘एक अलबेला’च्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. यात ती ज्येष्ठ अभिनेत्री गीता बाली यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटातला विद्या बालनचा लूक आऊट झाला आणि खरचं गीता बाली पुन्हा अवतरली की काय? असा भास सगळ्यांनाच झाला. प्रेक्षकांना हा सुखद धक्का देण्याचे श्रेय  मेक-अप आर्टीस्ट विद्याधर भट्टे आणि या चित्रपटाच्या वेशभूषाकार सुबर्णा राय चौधरी यांना जाते. पण याव्यतिरीक्त विद्याला मराठी चित्रपटात आणण्याचे श्रेयही विद्याधर भट्टे यांनाच जाते.
नुकतेचं  एक अलबेला चित्रपटातील ‘शोला जो भडके दिल मेरा धडके…’ गाणे लाँच करण्यात आले. त्यावेळी विद्याने स्वतः याविषयीचा खुलासा केला. विद्या म्हणाली की, मी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले तेव्हापासून विद्याधर माझे मेक-अपमन म्हणून काम करत होते. पण काही वर्षानंतर त्यांनी श्रेयस त्यांचा असिस्टंट याला माझा मेक-अपमन म्हणून नियुक्त केले. गेली दहा वर्ष श्रेयस माझ्यासोबत काम करतोय. पण विद्याधर आणि माझे नाते अजूनही तसेच आहे. त्यांनी काही मराठी चित्रपटांची निर्मिती केली होती. तेव्हा मी त्यांना म्हणालेले की तुम्ही मराठी चित्रपट काढा, मी तुमच्या चित्रपटात काम करेन. त्या दरम्यान, मला काही मराठी चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. पण काहींच्या कथा मला आवडल्या नाहीत तर काहीवेळा माझ्या इतर कामांमुळे मराठीत काम करणे जमू शकले नाही. एके दिवशी मी कोचीनमध्ये असताना विद्याधर यांचा मला फोन आला. त्यांनी मला सांगितले एक चांगला मराठी चित्रपट आहे. अर्थात मी तो चित्रपट काढत नाही आहे. पण तुला मराठीत पदार्पण करण्यासाठी हा चित्रपट उत्तम आहे. मग मी कोचीनवरून आल्यावर चित्रपटाची कथा ऐकली आणि ताबडतोब माझा होकार कळविला.
एक अलबेला या चित्रपटात मंगेश देसाई हा भगवान दादांची मुख्य भूमिका साकारत आहे. तर विद्या ही या चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून येणार असून ती गीता बाली यांच्या भूमिकेत दिसेल. भगवान दादांचा जीवनपट असलेला एक अलबेला येत्या २४ जूनला प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 9:23 am

Web Title: reson behind vidya balan sign marathi movie ekk albela
टॅग Vidya Balan
Next Stories
1 अक्षय कुमार माझ्यापेक्षा चारशेपट जास्त पैसे घेतो- रणदीप हुड्डा
2 फ्लॅशबॅक : जोडी असावी तर…
3 पाहा: अमेय आणि निपुणने घेतला ‘सैराट’मधील ‘प्रिन्स दादा’चा धसका!
Just Now!
X