News Flash

“बॉलिवूडमधल्या ड्रग्ज माफियांची नावं उघड कर”; उर्मिला मातोंडकरचं कंगनाला आव्हान

तिने नावं जाहीर केल्यास मी सर्वांत आधी तिला पाठिंबा देईन, असंही त्या म्हणाल्या.

संग्रहित छायाचित्र

कंगना रणौतने बॉलिवूडमधल्या ड्रग्ज माफियांची नावं उघड करावीत आणि संपूर्ण इंडस्ट्रीवर उपकार करावेत, असं आव्हान अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी दिलं. कंगनाने ड्रग्सविषयी इतकी वक्तव्ये केली आहेत, त्यामुळे संपूर्ण देशालासुद्धा त्या ड्रग्स माफियांची नावं जाणून घ्यायची आहेत, असंही त्या म्हणाल्या. कंगनाचं मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य, तिला देण्यात आलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा, ड्रग्सवरून तिने बॉलिवूडवर केलेली टीका यावरून उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाचा खरपूस समाचार घेतला.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, “कुठे आहेत ती नावं? कंगनाने समोर येऊन ती नावं सांगावित आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीवर उपकार करावेत. सर्वच गोष्टी बाहेर येऊदेत. तिने नावं जाहीर केल्यास मी सर्वांत आधी तिला पाठिंबा देईन. सतत दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा तिने एकदाची नावं सांगून टाकावीत.” संपूर्ण इंडस्ट्रीला ड्रग माफिया म्हणत बदनाम करणं चुकीचं असल्याचं मतंही त्यांनी मांडलं.

आणखी वाचा : “उर्मिला मातोंडकर ही सॉफ्ट पॉर्न स्टार”; कंगना पुन्हा बरळली

उर्मिला मातोंडकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतींमध्ये कंगनावर निशाणा साधला. कंगनाच्या वक्तव्यांचा विरोध करत त्यांनी तिला ड्रग्स माफियांची नावं उघड करण्याचं खुलं आव्हान दिलं. आता कंगना या आव्हानाला काय उत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 12:22 pm

Web Title: reveal names of bollywood big drug mafia lets have it all out says urmila matondkar to kangana ranaut ssv 92
Next Stories
1 ‘दु:ख दूर करण्यासाठी ड्रग्स…’, पूजा भट्टचे ट्विट व्हायरल
2 बोल्डनेसचा अतिरेक असलेल्या ‘या’ वेब सीरिजविषयी माहित आहे का?
3 “तिच्यावर बंदी घालण अशक्य”; कंगना विरुद्ध बॉलिवूड वादात विक्रम भट्ट यांची उडी
Just Now!
X