News Flash

VIDEO: ‘डॅडी’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

अरूण गवळीची गुन्हेगारी दुनिया आता रुपेरी पडद्यावर उलगडणार

अर्जुन रामपाल एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे

बॉलीवूडसह एकूणच चित्रपटसृष्टीवर अंडरवर्ल्ड, डॉन, भाईगिरी यांचा पहिल्यापासून वरचष्मा राहिला आहे. रामगोपाल वर्मासारख्या दिग्दर्शकाने तर अशा सिनेमांच्या निर्मितीची फॅक्टरीच सुरू केली होती. अगदी यश चोप्रा आणि यश जोहर यांच्यासारख्या दिग्गजांनाही अशा सिनेमांचा मोह आवरला नाही. त्यांनी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या ‘अँग्री यंग मॅन’ प्रतिमेचा वापर करून त्याकाळी चर्चेत असलेल्या गँगस्टर्सना वेगळ्या नावाने, कथेला वेगळा मुलामा देत अनेक सिनेमे केले. अजूनही या विषयांवरचे अनेक सिनेमे हिंदी आणि मराठीतही पाहायला मिळतात. या यादीत चक्क डॉन अरुण गवळीवरच्या हिंदी सिनेमाची भर पडली आहे.

दगडी चाळ आणि त्यात दडलेली अरूण गवळीची गुन्हेगारी दुनिया आता रुपेरी पडद्यावर उलगडणार असून या सिनेमात अर्जुन रामपाल अरूण गवळी उर्फ ‘डॅडी’च्या भूमिकेत दिसणार आहे. अर्जुनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन त्याचा या सिनेमातला फर्स्ट लूकही शेअर केला आहे. त्याने ट्विटरवर अरूण गवळीचा तरुणपणीचा फोटो शेअर केला. त्याचबरोबर त्याचाही सिनेमातला लूक त्याने दाखवला आहे. हे दोन्ही फोटो पाहताना त्यांच्यात फारच साम्य दिसून येते. हा व्हिडिओ पाहून प्रेक्षकांच्या मनातली या सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता अजूनच वाढली असेल यात काही शंका नाही.

‘डॅडी’ सिनेमाची कथा अरुण गवळी आणि दाऊद इब्राहिमच्या अवतीभोवती फिरताना दिसेल. त्यामुळे दाऊदच्या भूमिकेसाठी फरहान अख्तरची निवड करण्यात आल्याचे कळते. दाऊद आणि डॅडी हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. अभिनेता अर्जुन रामपाल आणि फरहान अख्तरची आता चांगलीच मैत्री झाली आहे. ‘रॉक ऑन’, ‘रॉक ऑन २’ नंतर आता हे दोन्ही कलाकार पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. इटलीतील रंगभूषाकाराने अर्जुनच्या रंगभूषेचे काम हाती घेतले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 3:03 pm

Web Title: revealed arjun rampal looks arun gawlis doppelganger first look daddy
Next Stories
1 ‘दंगल’ होणार करमुक्त?
2 सलमानला ‘दंगल’ चित्रपट दाखवण्यासाठी आमिर उत्सुक
3 आमिरच्या पत्नीचे एक कोटींचे दागिने चोरीला!
Just Now!
X