News Flash

फर्स्ट लूक: राणी मुखर्जीचा ‘मर्दानी’

हातात पिस्तूल, काळा कुरता आणि 'मर्दानी' लूक घेऊन लवकरच चित्रपटबारीवर अभिनेत्री राणी मुखर्जी आपल्या 'मर्दानी' या चित्रपटाच्या माध्यमांतून रसिकांच्या भेटीला येणार आहे.

| May 29, 2014 07:57 am

राणी मुखर्जीन यापूर्वी 'मर्दानी' या चित्रपटात दिसली होती.

हातात पिस्तूल, काळा कुरता आणि ‘मर्दानी’ लूक घेऊन लवकरच चित्रपटबारीवर अभिनेत्री राणी मुखर्जी आपल्या ‘मर्दानी’ या चित्रपटाच्या माध्यमांतून रसिकांच्या भेटीला येणार आहे.
‘मर्दानी’ या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रकाशित करण्यात आला आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी ही शिवानी शिवाजी रॉय या महिला पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रकाशित झालेल्या या पहिल्या पोस्टरमध्ये सध्यातरी कोणतीही पुरूष भूमिका दिसत नसल्याने हा सिनेमा देखील २०१४ साली प्रदर्शित झालेल्या क्विन, रिव्हॉल्वर राणी, गुलाब गँग या स्त्री-प्रधान चित्रपटांच्या वर्गवारीतील असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे.
दुसरी विशेष गोष्ट अशी की, अलिकडेच इटली येथे गुप्तपणे राणी मुखर्जीने लग्न केलेल्या चित्रपटकर्त्या आदित्य चोप्राच्या बॅनरचाच हा चित्रपट आहे.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2014 7:57 am

Web Title: revealed rani mukerji is a tough cop in mardaani
टॅग : Rani Mukerji
Next Stories
1 पैशांसाठी शाहरूखचे वाट्टेल ते!
2 सोनाक्षी सिन्हा आणि बॉक्सिंग?
3 अक्षय कुमारचे तरुणींना मार्शल आर्ट्सचे धडे!
Just Now!
X