09 March 2021

News Flash

सुशांत सिंह प्रकरण : रियाचं कुटुंबीयांसोबत मध्यरात्री गुपचूप पलायन?

रियाने केलं घरातून पलायन?

सुशांत सिंह मृत्युप्रकरणी सध्या मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस मिळून तपास करत आहेत. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी सुशांतची कथित प्रेयसी व अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणी रियाची चौकशी करण्यासाठी बिहार पोलीस रियाच्या घरी गेले होते. परंतु, यावेळी रिया घरी नसल्याचं आढळून आलं. विशेष म्हणजे सुशांतच्या वडिलांनी रियावर आरोप केल्यानंतर ३-४ दिवसांपूर्वीच ती कुटुंबीयांसोबत घर सोडून गेल्याचं ‘रिपब्लिक वर्ल्ड’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

रिया घरी नसल्याचं समजताच पोलिसांनी इमारतीच्या मॅनेजर आणि अन्य सदस्यांकडे रियाची चौकशी केली. यात रिया काही दिवसांपूर्वीच मध्यरात्री कुटुंबीयांसोबत घर सोडून गेल्याचं इमारतीच्या मॅनेजरने सांगितलं.

”दोन-तीन दिवसापूर्वीच रिया मध्यरात्री तिच्या कुटुंबीयांसोबत घर सोडून गेली. यावेळी त्यांच्याकडे मोठ-मोठ्या बॅग्सदेखील होत्या. ते एका निळ्या रंगाच्या गाडीतून निघून गेले. सुशांत अनेक वेळा रियाच्या घरी यायचा. मात्र आत्महत्या करण्याच्या काही काळापूर्वी त्याचं येणं-जाणं कमी झालं होतं”, असं मॅनेजरने सांगितलं.

दरम्यान, सुशांतच्या मृत्यूनंतर सुशांतच्या वडिलांनी रियावर अनेक आरोप केले आहेत. यात रियाने पैसे उकळल्याचा, मानसिक त्रास दिल्याचाही आरोप आहे. त्यामुळे सध्या पोलिसांनी त्यांची सूत्रे रियाच्या चौकशीच्या दिशेने वळविली असल्याचं पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 10:27 am

Web Title: rhea chakraborty and her family leave their mumbai apartment amid the investigation sushant singh rajput death ssj 93
टॅग : Sushant Singh Rajput
Next Stories
1 “ते दोघे एकदाच भेटले तर…”; दोन्ही आत्महत्येंचा संबंध असल्याचे म्हणणाऱ्यांना दिशाच्या आईचा सवाल
2 सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला सक्तीने केलं क्वारंटाइन
3 सुशांत सिंह प्रकरण : मुंबई पोलिसांसंदर्भातील नकारात्मक बातम्यांवर केदार शिंदेंचा संताप, म्हणाले…
Just Now!
X