अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी रियावर फसवणूकीचे आणि आर्थिक शोषणाचे आरोप केले आहेत. परिणामी सुशांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे रियावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान एक २० रूपयांची नोट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ‘रिया चक्रवर्ती बेवफा है’ असं या नोटेवर लिहिलेलं आहे. या नोटेद्वारे सुशांतचे चाहते रियाबाबत आपला राग व्यक्त करत आहेत.

“तुझं डोकं ठिकाणावर आहे का?” विचित्र फोटोमुळे अभिनेत्रीला केलं जातंय ट्रोल

“लडेंगे साथी जीतेंगे साथी”; डॉ. काफिल खान यांच्या सुटकेवर अभिनेत्याने व्यक्त केलं समाधान

चार वर्षांपूर्वी ‘सोनम गुप्त बेवफा है’ असं लिहिलेली एक १० रुपयांची नोट सोशल मीडियावर चर्चेत होती. या नोटेच्या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घातला होता. आश्चर्याची बाब म्हणजे २०१६ मध्ये ही नोट गुगल सर्चच्या यादीत तिस-या क्रमांकावर होती. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. यावेळी सुशांत मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘रिया चक्रवर्ती बेवफा है’ असं लिहिलेली नोट सोशल मीडियावर चर्चेत आहे. या २० रुपयांच्या नोटेच्या माध्यमातून सुशांतचे चाहते रियावर टीका करत आहेत.

सुशांत प्रकरणात आलं वेगळं वळण

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे. मुंबई पोलीस, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रमाणे एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा रियाने अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत केला. रियाने आजवर अमली पदार्थाचे सेवन केलेले नाही. मात्र तपासादरम्यान एनसीबीला रक्त किंवा अन्य चाचण्या आवश्यक वाटल्यास त्यासही ती तयार असल्याचे अ‍ॅड. मानेशिंदे यांनी सांगितले.

रियाच्या फोनमधून मिळवलेल्या चॅट्समध्ये ती सॅम्युअल मिरांडासोबत ड्रग्सविषयी चर्चा करत असल्याची समोर आली. रियाचे हे रिट्रीव चॅट्स असून तिने ते यापूर्वी डिलिट केले होते. यातील पहिल्या संभाषणात ती गौरव आर्यासोबत ड्रग्सविषयी बोलताना दिसत आहे. हे मेसेज ८ मार्च २०१७ चे आहेत. या चॅट्सविषयी खुलासा होताच सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने रियाविरोधात त्वरित कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.