सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे चर्चेत आलेल्या रिया चक्रवर्तीचा एक वादग्रस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडिवावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या मित्रांसोबत संवाद साधताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून तिला ट्रोल करण्यात आले होते. आता रियाने व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर स्पष्टीकरण दिले आहे.
तो मित्रांसाठी स्टँड-अप कॉमेडी अॅक्ट होता असे रियाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत म्हटले. तसेच रियाला कधीकधी कॉमेडी करायला आवडते आणि ताई हे त्यातीलच एक पात्र असे रियाने तिच्या टीमद्वारे म्हटले आहे.
काय म्हणाली होती व्हिडीओत?
या व्हिडीओत रिया चक्रवर्ती खळखळून हसताना दिसते आहे. मित्रांशी संवाद साधताना दिसते आहे तसंच ती असं म्हणते आहे की अपुन ताई है, छोकरा लोगको प्रोड्युसरसे हप्ता लाने को भेजती है. अपुन ताई है.. अपुनको पता है इन लोगोको कैसा मॅन्युपिलेट करना. अपुन गुंडा लोगसे गुंडागिरी करवता है. अपुनका बॉयफ्रेंडभी गुंडेमाफिक समजता है अपने आपको.. ये रेकॉर्ड मत करना.. अपुनको बोलेगा तो अपुन नहीं मानेगा असे काही संवाद आहेत. ती अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बोलताना दिसते आहे. मात्र या व्हिडीओमुळे ती चांगलीच ट्रोल झाली आहे.
अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी त्याची कथित प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सुशांतच्या वडिलांकडून रियावर फसवणूक आणि मानसिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सुशांतचे वकिल विकास सिंह यांनी सुशांतच्या कुटुंबीयांचा मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याचे देखील म्हटले होते. तसेच मुंबई पोलिसांतील कुणीतरी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मदत करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ समोर आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 1, 2020 8:45 am