21 September 2020

News Flash

“संपत्ती म्हणून सुशांतच्या ‘या’ दोनच गोष्टी माझ्याजवळ आहेत”; रियाचा खुलासा

ईडीने रियाची तब्बल आठ तास चौकशी केली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर पैसे उकळल्याचा आरोप केल्यानंतर ईडीने रियाची तब्बल आठ तास चौकशी केली. ईडीने रियाच्या संपत्तीबाबत चौकशी केली. त्याचसोबत सुशांतची संपत्ती म्हणून माझ्याकडे फक्त दोनच गोष्टी आहेत, असा खुलासा रियाने केला. या दोन गोष्टी म्हणजे सुशांतने एका पानावर लिहिलेल्या काही ओळी आणि ‘छिछोरे’ असं नाव लिहिलेली त्याची पाण्याची बाटली.

सुशांतने एका वहिच्या पानावर काही लोकांचे आभार मानले आहेत. रियाच्या कुटुंबीयांची नावं त्याने त्यात लिहिली आहेत. ‘कृतज्ञता यादी’ असं त्यावर लिहिण्यात आलं आहे. त्याखाली त्याने क्रमांकानुसार काही ओळी लिहिल्या आहेत. ‘१- मी माझ्या आयुष्यासाठी कृतज्ञ आहे. २- माझ्या आयुष्यातील लिल्लूसाठी मी कृतज्ञ आहे. ३- माझ्या आयुष्यातील बेबूसाठी मी कृतज्ञ आहे. ४- माझ्या आयुष्यातील सरांसाठी मी कृतज्ञ आहे. ५- माझ्या आयुष्यातील मॅडमसाठी मी कृतज्ञ आहे. ६. माझ्या आयुष्यातील फजसाठी मी कृतज्ञ आहे. ७. माझ्या आयुष्यातील सर्व प्रेमासाठी मी कृतज्ञ आहे’, असं त्याने लिहिलंय.

आणखी वाचा : सुशांतची केस आता ‘मर्दानी’च्या हाती; CBIच्या ‘या’ महिला IPS अधिकारी करणार तपास

या नावांपैकी लिल्लू म्हणजे माझा भाऊ शौविक, बेबू म्हणजे मी, सर म्हणजे माझे बाबा, मॅडम म्हणजे माझी आई आणि फज त्याचा कुत्रा आहे, असं रियाने स्पष्ट केलं. सुशांतने हे कधी लिहिलं होतं, ते मात्र स्पष्ट होऊ शकलं नाही. सुशांतच्या या दोनच गोष्टी संपत्ती म्हणून माझ्याजवळ असल्याचं रियाने सांगितलं.

सीबीआयने सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती, मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, माजी मॅनेजर श्रुती मोदी यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 1:04 pm

Web Title: rhea chakraborty claims it is the only property she has of the sushant singh rajput ssv 92
Next Stories
1 Justice For Sushant: अमेरिकेतील चाहत्यांचा सुशांतच्या कुटुंबीयांना पाठिंबा
2 रियाची ईडीकडून चौकशी होताच सुशांतच्या बहिणीने सोशल मीडियावर केली ‘ही’ पोस्ट
3 ‘फत्तेशिकस्त’ कसा घडला? झी टॉकिजवर दाखवणार खास कार्यक्रम
Just Now!
X