18 January 2021

News Flash

“किती खोट्या तक्रारी करणार?”; रिया चक्रवर्तीला सुशांतच्या बहिणीचा सवाल

सुशांत मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्तीच्या तक्रारीवरुन सुशांतच्या बहिणींविरोधात एफआयआर दाखल

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला दोन महिने उलटून गेले आहेत. सीबीआय आणि एनसीबीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान या प्रकरणातील संशयीत आरोपी रिया चक्रवर्ती हिने सुशांतच्या बहिणींविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप तिने केला. या आरोपावर सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे. “तू कितीही खोटे आरोप कर, खोट्या तक्रारी कर पण आमचं धैर्य खचणार नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन तिने रियावर जोरदार टीका केली आहे.

अवश्य पाहा – १३ किलो वजन कमी करणाऱ्या ‘फॅट’ अभिनेत्रीचा ‘फीट’ लूक

अवश्य पाहा – “आता खरी माहिती बाहेर पडेल”; सुशांत प्रकरणावर वकिल विकास सिंह यांची प्रतिक्रिया

रिया चक्रवर्ती काय म्हणाली तक्रारीत?

सुशांतच्या दोन बहिणी व डॉक्टर तरुण कुमार यांच्यावर भारतीय दंड संहितेतील ४२०, ४६४, ४६५, ४६६, ४६८, ४७४, ३०६ आणि १२० बी कलमानुसार एफआयआर दाखल करण्यात आली आहे. “८ जून रोजी सुशांतने मला त्याच्या फोनमधील मेसेज दाखवले ज्यामध्ये त्याची बहीण प्रियांकासोबत त्याची चर्चा झाली होती. प्रियांकाने त्याला एक औषधांची यादी पाठवली. रियाने त्यावर आक्षेप घेतला असता सुशांतने बहिणीने सांगितलेलीच औषधं घेणार असल्याचं स्पष्ट केलं.” असं रियाने या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

शोविक चक्रवर्तीसह दोघांना अटक

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) शुक्रवारी रात्री अटक केली. चक्रवर्ती कुटुंबातील ही पहिलीच अटक आहे. या घडामोडीमुळे सुशांतच्या मृत्यूनंतर दोन महिने चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांना अंमलीपदार्थाबाबतचे तपशील का मिळू शकले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शोविकनंतर एनसीबी रियाकडे चौकशी करण्याची शक्यता आहे.
शोविक, मिरांडा यांनी सुशांतला अंमलीपदार्थाच्या नशेची सवय लावून अंमलीपदार्थ पुरवल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत. दोघांच्या अटकेला एनसीबीचे उपसंचालक के पीएस मल्होत्रा यांनी दुजोरा दिला. सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नोंदवलेल्या गुन्ह्य़ात रियासह शोविक आणि मिरांडा संशयित आरोपी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 11:44 am

Web Title: rhea chakraborty fir against sushants sisters shweta singh kirti replay mppg 94
Next Stories
1 रियाच्या तक्रारीवरून सुशांतच्या बहिणींविरोधात एफआयआर दाखल
2 कंगनाला मिळालेल्या Y+ सुरक्षेवरून स्वरा भास्करचा सरकारला अप्रत्यक्ष टोला
3 Bigg Boss 14 : स्पर्धक करू शकणार मॉलमध्ये शॉपिंग, पाहू शकणार थिएटरमध्ये सिनेमा
Just Now!
X