अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीकडून तब्बल आठ तास चौकशी झाली. ईडी कार्यालयात रियासोबत तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी उपस्थित होते. सुशांतच्या बँक खात्यातून रियाने १५ कोटी रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केला आहे. या आरोपांबाबत ईडीने रियाची चौकशी केल्याचं समजतंय.

रिया आणि शौविक यांनी काही कंपन्या स्थापन केल्या आहेत. मात्र, या कंपन्यांचा कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. या कंपन्या मनी लॉन्ड्रिंगसाठी स्थापन करण्यात आल्या होत्या का? या कंपन्यांचं रजिस्ट्रेशन होतं का? असे सवाल ईडीकडून उपस्थित करण्यात आले आहेत. रिया चक्रवर्तीकडे कोट्यवधी रुपये किमतीचे दोन फ्लॅट असल्याचं ईडीच्या तपासात उघड झालं आहे. या फ्लॅटमधील गुंतवणुकीबाबत रियाची कसून चौकशी झाली.

 

दुसरीकडे बिहार सरकारच्या सीबीआय चौकशीच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकारने सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. केंद्र सरकारने याबाबत आदेश दिले. सीबीआयने तातडीने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती, मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, माजी मॅनेजर श्रुती मोदी यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.