बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. पण सुशांतने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समोर आलेले नाही. या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला. आज सुशांतचे निधन होऊन एक महिना झाला आहे. दरम्यान सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर भावूक पोस्ट करत त्याच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे.

रियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुशांतसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही अतिशय आनंदी असल्याचे दिसत आहेत. ‘तूच एक असा व्यक्ती होता ज्याने मला प्रेमावर विश्वास ठेवायला शिकवले आणि प्रेमाची ताकद दाखवून दिली होती. एखाद्या सामान्य गणिताचे समीकरण जीवनाचा अर्थ कसा उलगडू शकेल हे तू मला शिकविले.. आणि दररोज मी तुझ्या कडून नवीन गोष्टी शिकले’ या आशयाची पोस्ट तिने लिहिले आहे.

candidates chess 2024 vidit gujrathi beats nakamura
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय, गुकेशची प्रज्ञानंदशी बरोबरी; नेपोम्नियाशीसह संयुक्त आघाडीवर
australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी
Narendra Modi at rbi event
“मी पुढचे १०० दिवस व्यस्त, मात्र शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी…”, रिझर्व्ह बँकेला पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन

 

View this post on Instagram

 

Still struggling to face my emotions.. an irreparable numbness in my heart . You are the one who made me believe in love, the power of it . You taught me how a simple mathematical equation can decipher the meaning of life and I promise you that I learnt from you every day. I will never come to terms with you not being here anymore. I know you’re in a much more peaceful place now. The moon, the stars, the galaxies would’ve welcomed “the greatest physicist “with open arms . Full of empathy and joy, you could lighten up a shooting star – now, you are one . I will wait for you my shooting star and make a wish to bring you back to me. You were everything a beautiful person could be, the greatest wonder that the world has seen . My words are incapable of expressing the love we have and I guess you truly meant it when you said it is beyond both of us. You loved everything with an open heart, and now you’ve shown me that our love is indeed exponential. Be in peace Sushi. 30 days of losing you but a lifetime of loving you…. Eternally connected To infinity and beyond

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty) on

सुशांतच्या निधनाने रियाला धक्काच बसला होता. ती सोशल मीडियापासून दूर गेली होती. तसेच तिने इन्स्टाग्रामवर तिचा कमेंट सेक्शन प्रायवेट केला होता. आता रियाने सुशांतच्या निधनानंतर पहिल्यांदा पोस्ट लिहिली आहे. सुशांतच्या आठवणीने भावूक झालेल्या रियाने तिच्या व्हॉट्सअॅपचा डीपीही बदलला आहे. तिने तिचा आणि सुशांतचा फोटो ठेवला आहे. या फोटोमध्ये दोघेही अतिशय आनंदी असल्याचे दिसत आहे.

सुशांत आणि रिया नोव्हेंबरमध्ये लग्न बंधनात अडकणार असल्याचे प्रॉपर्टी डिलर सनी सिंहने सांगितले होते. रियाने लग्नानंतर एकत्र राहण्यासाठी प्रॉपर्टी डिलरला घर पाहण्यासाठी सांगितले होते. सुशांतच्या कुटुंबातील एका सदस्याने देखील सुशांत नोव्हेंबरमध्ये लग्न बंधनात अडकणार होता असे म्हटले होते. पण सुशांत कोणाशी लग्न करणार होता हे त्यांनी सांगितले नव्हते.

सुशांतने १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुशांतच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी कलाविश्वातील अनेकांची चौकशी केली असून त्यात सुशांत संदर्भातील अनेक गोष्टींची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत २८ जणांचा जबाब नोंदविला आहे.