News Flash

Father’s Day : ‘मला माफ करा ती वेळच…’; रियाने फोटो शेअर करत मागितली माफी

रियाची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

रियाची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

आज २० जून ‘फादर्स डे’ आहे. ‘फादर्स डे’च्या निमित्ताने सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर वडिलांसोबत फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत प्रत्येक व्यक्ती त्यांच्या वडिलांना ‘फादर्स डे’च्या निमित्ताने शुभेच्छा देताना दिसतं आहे. दरम्यान, रिया चक्रवर्तीने देखील तिच्या वडिलां सोबत एक फोटो शेअर करत त्यांना ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा : सलमान, अक्षय नंतर आता केआरकेचा विद्या बालनशी पंगा, म्हणाला..

रियाने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये रिया आणि तिचे वडील दिसतं आहेत. हा रियाचा लहानपणीचा फोटो आहे. हा फोटो शेअर करत “फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा बाबा! तुम्ही माझी प्रेरणा आहात. मला माफ करा ती वेळ खूप कठीण होती, पण तुमची लहान मुलगी असल्याचा मला अभिमान आहे,” अशा आशयाचे कॅप्शन रियाने त्या फोटोला दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

आणखी वाचा : ‘अक्षयला गरीबांचा मिथुन चक्रवर्ती बोलायचे; माझ्या गाण्यांमुळे…’, अभिजीत भट्टाचार्य

सुशांतच्या मृत्यू प्रकरणात बऱ्याचदा गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचं नाव समोर आलंय. ती सुशांतसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होती. सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस अगोदरच रिया त्याच्या घरातून निघून गेली होती. याशिवाय ड्रग्ज प्रकरणात सुद्धा रियाला कित्येक दिवस कारागृहात रहावं लागलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 6:34 pm

Web Title: rhea chakraborty pens emotional note for her dad on fathers day dcp 98
Next Stories
1 इंडियन आयडल १२ : ‘या’ दोन गायकांना हिमेश रेशमीयाने दिली म्युझिक अल्बममध्ये संधी
2 ‘बुगी वुगी’मधून जिंकलेल्या ५ लाखांमधून फेडलं वडिलांवरचं कर्ज; धर्मेशने सांगितली संघर्षाची कहाणी
3 ‘बायको अशी हव्वी’ आणि ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेत विवाह विशेष सप्ताह !
Just Now!
X