02 March 2021

News Flash

रिया चक्रवर्तीनं माध्यमांविरोधातच दाखल केली सर्वोच्च न्यायालयात याचिका

सुशांत प्रकरणात दोषी ठरवलं; रियाने केला माध्यमांवर आरोप

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून रियाकडे माध्यमांनी गुन्हेगाराच्या दृष्टीने पाहण्यास सुरुवात केली, असा आरोप रियाच्या वकिलांनी केला आहे. परिणामी माध्यमांविरोधात रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

…तर रणबीरला ‘रेपिस्ट’ आणि दीपिकाला ‘सायको’ का नाही म्हणत? कंगनाने विचारला प्रश्न

अवश्य पाहा – ‘जनता तुला माफ करणार नाही’; रियाला पाठिंबा देणाऱ्या आयुषमानवर संतापला अभिनेता

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार माध्यमांकडून केले जाणारे आरोप थांबवण्यासाठी रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोर्टाचा निकाल लागण्यापूर्वीच माध्यमांनी रियाला दोषी ठरवलं. तसेच तिची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न थांबवण्यासाठी तिने याचिका दाखल केली आहे.

सुशांत मृत्यू प्रकरण : मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलेले १० महत्त्वाचे मुद्दे

१. सुशांत मृत्यू प्रकरणी आतापर्यंत ५६ लोकांचे जबाब नोंदवले गेले आहेत. व्यावसायिक वैर, आर्थिक व्यवहार किंवा आरोग्य अशा सर्व मुद्द्यांवरून तपास सुरू आहे.
२. सुशांत दुभंगलेलं व्यक्तिमत्त्व (bipolar disorder) या मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्यासाठी तो उपचार घेत असल्याचं उघडकीस आलं आहे.
३. कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला हा आमच्या तपासाचा विषय आहे.
४. १६ जून रोजी सुशांतचे वडील, बहीण आणि मेहुण्याचा जबाब नोंदवला गेला.
५. त्यावेळी सुशांतच्या कुटुंबीयांनी आमच्या तपासाबद्दल कोणतीच शंका उपस्थित केली नव्हती. आमच्या तपासात काही त्रुटी असल्याची तक्रारसुद्धा त्यांनी केली नव्हती.
६. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवलेल्या ५६ लोकांमध्ये रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे.
७. रियाचा जबाब दोन वेळा नोंदवला गेला. तिला पोलीस ठाण्यातही अनेकदा बोलावलं गेलं.
८. ती आता कोठे आहे, याबाबत मी वक्तव्य करू शकत नाही.
९. बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढून घेण्यात आले.
१०. सुशांतच्या खात्यात १८ कोटी रुपये होते आणि त्यापैकी साडेचार कोटी रुपये अजूनही खात्यात आहेत, असं आमच्या तपासात निदर्शनास आलं. सुशांतच्या अकाऊंटमधून रियाच्या अकाऊंटमध्ये थेट पैसे ट्रान्सफर झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. याबाबत अजून तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 4:29 pm

Web Title: rhea chakraborty supreme court unfair media trial mppg 94
Next Stories
1 आमिर खानचा बहुचर्चित चित्रपट ‘लालसिंग चड्ढा’च्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल
2 कंगनाने आयुषमानवर निशाणा साधताच नेटकरी संतापले, म्हणाले…
3 मृण्मयी रमली ‘केसर’च्याआठवणीत
Just Now!
X