अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) मंगळवारी अटक केली. तसेच न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून तिला ‘न्यायालयीन कोठडी’ सुनावली आहे. दरम्यान रिया चक्रवर्तीचं एक जुनं ट्विट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या ट्विटमध्ये रियाने ड्रग्स रॅकेटमध्ये पकडल्या गेलेल्या एका तरुणीबाबत आश्चर्य व्यक्त केलं होतं. या ट्विटच्या पार्श्वभूमीवर नेटकऱ्यांमार्फत सध्या तिची खिल्ली उडवली जात आहे.

अवश्य पाहा – ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्री संजना गलरानीला अटक

“आत्ताच मी एका तरुणीबाबत धक्कादायक बातमी ऐकली. या तरुणीला अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी चार वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला होता.” अशा आशयाचं ट्विट रियाने केलं होतं. खरं तर हे ट्विट तिने २००९ मध्ये केलं होतं. परंतु आता तिला देखील ड्रग्स प्रकरणात तुरुंगात जावं लागलं आहे. त्यामुळे या ट्विटच्या पार्श्वभूमीवर तिला ट्रोल केलं जात आहे.

अवश्य पाहा – “अनधिकृत बांधकाम उभारलं तेव्हा कुठे होता?”; BMCच्या कारवाईवर दिया मिर्झा संतापली

अंमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला. ‘एनसीबी’चे पथक रविवारपासून रियाची चौकशी करत होते. याआधी रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, कैझान इब्राहिम, अब्देल बसीत परिहारसह नऊ जणांना ‘एनसीबी’ने अटक केली आहे. त्यापैकी शोविक, सॅम्युअल, दीपेश यांच्यासमोर रियाची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अमली पदार्थाशी जोडलेले आहेत का, याबाबतही ‘एनसीबी’कडून तपास सुरू आहे.