बॉलीवूडमध्ये जणू काही प्रेमाऐवजी ब्रेकअपचेच वारे वाहू लागले आहेत असे वाटते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणखीन एका बॉलीवूड अभिनेत्रीचा ब्रेकअप झाल्याचे कळते.
मसाण या चित्रपटातील अभिनयाने सर्वांचीच मने जिंकणारी अभिनेत्री रिचा चड्डा तिच्या प्रियकरापासून विभक्त झाली असल्याचे कळते. फ्रान्स स्थित अभिनेता-दिग्दर्शक फ्रॅन्क गॅस्टॅमबाइड आणि रिचा गेले काही महिने रिलेशनशीपमध्ये होते. परंतु दोन देशांमधील अंतराचा परिणाम त्यांच्या नात्यावर झाला. कामामुळे या दोघांनाही एकमेकाला वेळ देता येत नव्हता. डिसेंबर महिन्यात त्यांची शेवटची भेट झाली होती. इतकेच काय पण रिचाने फ्रान्स भाषेचे धडे घेण्यासही सुरुवात केलेली. ती अनेकदा फ्रॅन्कसोबत वेळ घालवता यावा याकरिता फ्रान्सलासुध्दा गेली होती. परंतु, सध्या ती ‘सरबजीत’ आणि ‘कॅब्रे’ चित्रपटांच्या चित्रीकरणात अडकल्यामुळे तिला आपल्या नात्यासाठी वेळ देता येत नव्हता. शेवटी या दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 15, 2016 12:04 pm